कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने महिलांचा सन्मान

कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने महिलांचा सन्मान

Kopargaon city police honors women

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Thu 10 Mar 2022 17:,50Pm.

कोपरगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहर पोलीस यांच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केले आहे. अशा महिलांचा सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये कोपरगाव शहरातील व तालुक्यातील विविध क्षेत्रातील ज्या महिलांनी उल्लेखनीय काम केले अशा महिलांचा पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

यावेळी श्रीमती रश्मीताई जोशी स्वयंसेवी संस्था कोपरगांव, सौ.दिपाली आचारी लायन्स क्लब महीला सदस्य कोपरगांव, डॉ.तेजश्री नाईकवाडे नेत्ररोग तज्ञ कोपरगांव, सौ.मंजुषा सुरवसे प्राचार्य डॉ.सी.एम.मेहता कन्या विदयामंदीर, कोपरगांव, ॲङ श्रध्दा जवाद कोपरगांव कोर्ट, सौ.सुनिता रमेश गवळी-कोपरगाव एस.टी.आगार लेखकार, ॲड.शितल देशमुख -वकील, सौ.शबाना शेख – प्रभारी गटशिक्षण अधिकारी, सौ.शबनम शेख मुख्याध्यापीका न.पा.उर्दु हायस्कुल कोपरगांव, श्रीमती सुरेखा जाधव परीचारीका,  श्रीमती संगीता अशोक सोनवणे, श्रीमती मिना तुळसीराम शिंदे सफाई कर्मचारी नगरपालीका, श्रीमती सरला बाळु डाके सफाई कर्मचारी नगरपालीका, श्रीमती वैशाली आढाव महीला दक्षता समीती, डॉ.अर्चना मुरुमकर महीला दक्षता समीती, कु. श्वेतांबरी रमेश राऊत, श्रीमती स्वाती मुळे महीला दक्षता समीती, ॲङ पी.बी.पाटणी महीला दक्षता समीती, सौ.लिना आचारी पोलीस पाटील संवत्सर, सौ.सविता आढाव पोलीस पाटील, शिंगणापुर, मपोकॉ/ सुवर्णा कानवडे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, मपोकॉ/ विजया दिवे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, मपोकॉ/ मंजुषा त्रिभुवन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, मपोकॉ/अंजली भांगरे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन, मपोहेकॉ/ गलांडे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन,मपोकॉ/ फिजा पठाण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन,महीला होमगार्ड जी.एस. अनार्थे, महीला होमगार्ड अनिता पवार इतरही विविध क्षेत्रातील महीलांना महीला कायदयाविषयी माहीती, डायर ११२ तसेच पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते याबाबत माहिती देवुन महीला सक्षमीकरणाकरीता काय-काय उपाययोजना केल्या पाहिजेत या बाबत मार्गदर्शन केले.

ॲड.श्रध्दा जवाद व ॲड.शितल देशमुख यांनी महिलांना कायद्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच डॉ.तेजश्री नाईकवाडे नेत्ररोग तज्ञ कोपरगांव यांनी आरोग्य विषयी कशाप्रकारे काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.

उपस्थितीत  सर्व महीलांचा फेटा बांधुन पुष्पगुच्छ व शाल देवुन सत्कार केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page