“विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतलं नाही तर बस अडवावी लागेल”- आ. आशुतोष काळे यांचा एस.टी. प्रशासनाला इशारा
“If students are not allowed to board the bus, the bus will have to be blocked” – MLA Ashutosh Kale’s warning to the ST administration.
कोपरगाव आगारात ५ नवीन‘राजमाता जिजाऊ ’ बसांचे लोकार्पण, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun15Mon 20.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : राज्यात शाळा-महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी दररोज एस.टी. बससेवेवर अवलंबून आहेत. मात्र लांब पल्ल्याच्या बसेस छोट्या थांब्यांवर न थांबणे, बसफेऱ्यांची कमतरता आणि जागा असूनही विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश न देण्याच्या वाढत्या तक्रारींवर आमदार आशुतोष काळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
“विद्यार्थ्यांना जागा असूनही बसमध्ये घेतले जात नसेल, तर विद्यार्थ्यांसाठी मला ती बस अडवावी लागेल,” असा थेट सूचक इशारा त्यांनी एस.टी. प्रशासनाला दिला.
सोमवारी कोपरगाव बस आगारात नव्याने दाखल झालेल्या ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसांचे लोकार्पण आ. काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय अधोरेखित करत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
आ. काळे म्हणाले, कोपरगाव आगारातील बससंख्या कमी झाल्याने अनेक मार्गांवरील फेऱ्या विस्कळीत झाल्या होत्या. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सव्वा वर्षात कोपरगाव आगाराला १० लालपरी आणि आता ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस मिळाल्या आहेत.
पुढे चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर कोपरगावसाठी इलेक्ट्रिक बसचीही मागणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी डेपो मॅनेजर अमोल बनकर, वाहतूक निरीक्षक अमित हांपे, आगार लेखाकार मिलिंद कोपरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.