निळवंडे कालव्यासाठी ३६५ कोटीच्या तरतुद – ना. आशुतोष काळे

निळवंडे कालव्यासाठी ३६५ कोटीच्या तरतुद – ना. आशुतोष काळे

Provision of 365 crore for Nilwande canal – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Sat 12 Mar 2022 17:,21Pm.

कोपरगाव : काल जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागात साठी १३ हजार ५५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात बहुचर्चित निळवंडे कालव्यांसाठी ३६५ कोटी रुपयांची तरतूद उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी केली आहे.अशी माहिती श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

२०२४ पर्यत जिरायती भागातील गावात टेल टू हेड पाणी पोहोचलेच पाहिजे असा महाविकास आघाडी सरकारने निर्धार केला आहे. निळवंडे कालव्यासाठी ३६५ कोटी रुपयांची तरतूद केल्याने निळवंडे कालव्यांच्या कामाला गती मिळणार असून कालवे झाल्यानंतर कोपरगाव,अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व सिन्नर या सात तालुक्यातील दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या १८२ गावांना वरदान ठरणार असून ६८,८४८ हजार हेक्टर क्षेत्राचा सिंचनाचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे असे ना. काळे यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दशकांपासून निळवंडे कालवे यांचा प्रश्न रेंगाळला होता २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळे कोरोना चे संकट असतानाही दोन वर्षात ४९१ कोटी निधी मिळाला असून निळवंडे कालव्यांची कामे प्रगतीपथावर आहे. आता अर्थसंकल्पात नव्याने ३६५ कोटी निधीची तरतूद करण्यात आल्याने निळवंडे कालवा लाभ क्षेत्रातील  शेतकरी व नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. २०२४ पर्यंत नक्कीच निळवंडे कालवे वाहतील व १८२ गावातील परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे तो दिवस दूर नाही असे ना. आशुतोष काळे यांनी शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page