काकडी विमानतळ : १५० कोटी निधीची तरतूद; साई भक्तांची गर्दी वाढणार – ना. आशुतोष काळे

काकडी विमानतळ : १५० कोटी निधीची तरतूद; साई भक्तांची गर्दी वाढणार – ना. आशुतोष काळे

Kakadi Airport: Provision of Rs 150 crore; Crowd of Sai devotees will increase – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Sat 12 Mar 2022 18:,19Pm.

कोपरगाव : राज्याच्या २०२२/२३ च्या अर्थसंकल्पात काकडी विमान तळाच्या सर्वांगिण विकासासाठी १५० कोटीची तरतूद या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे साईभक्तांना चांगल्या सुविधा मिळणार असून यामुळे दिवस-रात्र विमानसेवा सुरू होऊन परदेशातून येणाऱ्या साई भक्तांची गर्दी वाढणार आहे. त्याचबरोबर काकडी विमान तळ परिसराचा देखील विकास होणार असल्याचे साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव तालुक्यातील सीमेवरील काकडी गावांची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी माजी आमदार अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात काकडी येथे विमानतळ आणले. विमानतळ झाल्यामुळे जगभरातील साई भक्तांना शिर्डी येथे दर्शनासाठी येण्यासाठी होत असलेली गैरसोय दूर होऊन परिसराचा विकास होण्यास मोठी मदत झाली.

याबाबत बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले, काकडी विमानतळावर डीव्हिओआर अर्थात कमी दृष्यमानतेवर मात करणारी ‘डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज’ हि सेवा बंद असल्यामुळे नाईट लँडिंग सुविधा बंद झाली होती. त्यामुळे साई भक्तांची गैरसोय होवून विमानाने येणाऱ्या साईभक्तांवर अवलंबून असणाऱ्या टॅक्सी चालकांचे देखील नुकसान होत होते. त्याबाबत विमान प्राधिकरण अधिकारी यांच्या समवेत उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या दालनात ना. आशुतोष काळे यांनी बैठका घेतल्या घेवून राज्याचे त्यांच्याकडे काकडी विमानतळाच्या सोयी सुविधांसाठी निधी मिळावा याबाबत मागणी केली होती. याची दखल घेऊन मंत्री अजित पवार यांनी नुकतीच अर्थसंकल्पात काकडी विमानतळासाठी १५० कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. यामुळे परदेशीय साई भक्तांची गर्दी वाढून परिसराचा विकास होणार आहे. असे ना.काळे यांनी शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page