पुरस्कार: कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे “शंभूगर्जना” पुरस्काराने सन्मानित

पुरस्कार: कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे “शंभूगर्जना” पुरस्काराने सन्मानित

 Awards: President of Kopargaon Industrial Estate Vivek Kolhe honored with “Shambhugarjana” Award

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Fit 11 Mar 2022 19:,21Pm.

कोपरगाव : तालुक्यातील येसगाव येथील भूमिपुत्र कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष तथा नगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना २०२२ चा “शंभूगर्जना” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती यांचे वतीने हा पुरस्कार धर्मवीर गड श्रीगोंदा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्फूर्ती दिन अभिवादन सोहळा प्रसंगी राजमाता जिजाऊ यांचे वडील लखोजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे दत्तात्रयराजे जाधव यांच्या हस्ते शंभू गर्जना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

विवेक कोल्हे कोपरगाव येसगाव येथील मुळ रहिवासी असून संजीवनी यूवा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना काळात कोविड सेंटरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या मोफत आरोग्य सुविधा, वृक्षारोपण, रक्तदान शिबीरे, सर्वधर्मीय विवाह सोहळे,पूरग्रस्तांना मदत,स्वदेशी पॅरासिटामॉल या औषध निर्मिती क्षेत्रात विवेक कोल्हे यांचे योगदान अशा विविध व्यापक कामांची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत निष्ठावंत शिलेदार म्हणून कार्य केलेल्या वीर तानाजी मालुसरे, वीर संताजी घोरपडे,वीर येसाजी कंक या वीर योध्यांचे वंशज आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शंभूगर्जना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विवेक कोल्हे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिन स्फूर्ती दिवस म्हणून साजरा होतो आहे. आपल्या राजांचा अंगावर शहारे आणणारा इतिहास हजारो तरुणांसमोर गेला पाहिजे यासाठी या ऐतिहासिक क्षण जपले जाणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती या शब्दातच सेवा हा शब्द आहे यावरूनच हा पुरस्कार किती मौल्यवान आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.धर्मवीर गडाचा विकास व्हावा यासाठी सर्वप्रथम विजेची व्यवस्था गडावर होण्यासाठी विवेक कोल्हे यांनी सौरदिव्यांसाठी ५१ हजारांची आर्थिक रक्कम सेवा समितीच्या कामासाठी सेवा म्हणून देऊ केली. यावेळी विवेक कोल्हे यांचे अभिनंदन करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे व बिपीन कोल्हे यांनी गोदावरीच्या पूरपरिस्थितीत हेलिकॉप्टरने पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला.

चौकट

मला मिळालेला हा पुरस्कार मी राजमाता जिजाऊ माँ साहेब,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करतो व ज्यांनी कोविड काळात मोलाचे काम केले,अनेकांना मदत करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे माझे सहकारी, कोपरगाव मतदारसंघातील सर्व नागरिकांना हा पुरस्कार समर्पित करतो- विवेक कोल्हे

या प्रसंगी सुभेदार कुणाल मालुसरे, आकाशराजे कंक, रणधीरआप्पा घोरपडे, अमित गाडे, श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे,जळगाव तहसीलदार महेंद्र माळी, डॉ.प्रणोती राहूल जगताप,आदेश नागवडे, प्रा.श्री.सतीश शिंदे, श्रीमती लताबाई पवार, अर्जुन कांचन, कल्याणी लोखंडे, शंकरआप्पा जाधव,भारती इंगवले, चंद्रकांत औताडे, आप्पासाहेब औताडे, विलास रोहमारे,राजेंद्र मोरे, सौ.मिना शिंदे, अविनाश पाठक,विक्रम पाचोरे,अनुराग येवले,अतुल सुराळकर, किरण गायकवाड, धनंजय माळी, भाऊसाहेब सोनवणे, विकास मोरे, कानिफनाथ गुंजाळ, विशाल गोर्डे, सिद्धार्थ साठे,ऋषिकेष कदम, अमोल गवळी,प्रमोद संवत्सरकर, निखिल औताडे,महेंद्र नाईकवाडे,रोहित कनगरे, गणेश थोरात,गणेश मोरे, प्रशांत संत, सतीश निकम, चेतन कोकाटे, ज्ञानेश्वर सोनवणे,सागर तांबे, जगन्नाथ वर्पे,गौरव वर्पे, अभिषेक शिंदे आदिंसह छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे पदाधिकारी,विविध संघटना व शिव-शंभुभक्त,शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page