कोपरगाव नगर परिषद: राष्ट्रीय लोक अदालत, साडे सात लाखाचा वसूल- मुख्याधिकारी गोसावी

कोपरगाव नगर परिषद: राष्ट्रीय लोक अदालत, साडे सात लाखाचा वसूल- मुख्याधिकारी गोसावी

Kopargaon Municipal Council: National Lok Adalat, recovery of seven and a half lakhs – Chief officer Gosavi

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Sat 12 Mar 2022 19:,19Pm.

कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेने राष्ट्रीय लोक अदालत च्या माध्यमातून शनिवारी एका दिवसात सात लाख ६६ हजार ५४९ रुपयाचा वसूल केला असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

वसुली बाबत अधिक माहिती देताना मुख्याधिकारी गोसावी म्हणाले, कोपरगांव तालुका विधी सेवा समिती व कोपरगांव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नगर पालिका कार्यालयात
शनिवारी रोजी सकाळी १०:०० वाजेपासुन राष्ट्रीय लोक अदालत मार्फत कोपरगांव शहरातील थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी धारकाची वसुली प्रकरणाची तडजोडी करणेची मोहीम राबविण्यात आली.
याकरिता कार्यालयात नागरिकांच्या सोयीकरिता एकुण ०७ कॅश काऊंटर लावण्यात आलेली होती. यासाठी एकुण ०९ पथकांची नियुक्ती करण्यात येऊन नागरिकांना माहिती देण्यासाठी व थकीत असलेल्या मालमत्ता कराचा भरणा करण्याचे काम नेमणुक केलेल्या पालिकेच्या नियंत्रण अधिकारी आणि पथकातील कर्मचारी यांनी केले.

राष्ट्रीय लोक अदालत करिता पॅनल प्रमुख न्यायमुर्ती एल,एम.सय्यद, पॅनल सदस्य ॲड. एम.एस.भिडे, ॲड.ए. एस. आगवान आदी उपस्थित होते.

सदर राष्ट्रीय लोक अदालतच्या कार्यवाहीसाठी मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, करनिरीक्षक श्वेता शिंदे, पल्लवी सुर्यवंशी, डिमांड धारक संजय तीरसे, आकाश दिनकर, राजेंद्र इंगळे, रत्नप्रभा अमोलिक, रविंद्र वाल्हेकर, अरुण थोरात, राजेंद्र शेलार यांच्यासह कर वसुली पथक प्रमुख व सर्व कर्मचारी यांनी सदर मोहिम यशस्वी होणेकामी परिश्रम घेतले.

चौकट
१ मार्च ते ११ मार्च २०२२ दरम्यान कर धारकांनी आपल्या थकीत कराचा भरणा ८१ लाख ७० हजार ७२०/- केलेला आहे.—– मुख्याधिकारी शांताराम गोसावी

Leave a Reply

You cannot copy content of this page