सहकार महर्षी शंकरराव कोल्हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व
Sahakar Maharshi Shankarrao Kolhe is a multi-faceted personality
जन्म- २४ मार्च १९२९, मृत्यू १६ मार्च २०२२Born March 24, 1929, died March 16, 2022
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Wed 16 Mar 2022 11:,00Am.
कोपरगाव : तालुक्यातील येसगाव येथील शंकरराव गेनुजी कोल्हे म्हणजेच संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, महसुल, कृषी, सहकार, परिवहन, कमाल जमीन धारणा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजीमंत्री व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे सुत्रधार संचालक, सहकाररत्न,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व
शिक्षण – बी. एस्सी (ऍ़ग्री) पूणे विद्यापीठ १९५०, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे शेती विषयक अभ्यासक्रमाचे ६ महिने प्रशिक्षण. युरोप मध्ये ३ महिने उच्च शिक्षणाचे प्रशिक्षण.व्यवसाय-शेती.१९७२ ते १९९३ तर १९९० ते १९९९ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी तर १९९९ ला महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
राजकीय प्रवास
१९५० -सरपंच, येसगांव
१६५३-१९६० -अध्यक्ष, कोपरगांव तालुका विकास मंडळ (टी.डी.बी)
१९५९ – अध्यक्ष, कोसाका, आत्ताचा कर्मवीर श्ंकरराव काळे सह.साखर कारखाना लि.),१९६२ ते आजपर्यंत- संस्थापक अध्यक्ष, सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे साखर कारखाना लि,१६६९ते १९७१- उपाध्यक्ष, १९७१ते १९७५ अध्यक्ष व १९७३ते२००४ -विद्यमान संचालक,महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई,१९७२ -अध्यक्ष, शेतीमाल प्रक्रिया व विक्री वितरण अभ्यास समिती (कॅबीनेट दर्जा).,१९७२ ते१९८४व १९९० ते२००४ कोपरगाव आमदार (१९७२-अपक्ष, १९७८-काँग्रेस (आय), १९८०-काँग्रेस (आय)१९९०-काँग्रेस (आय), १९९५-काँग्रेस (आय),१९९९-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,)१९७५ ते २०२०पर्यंत- मॅनेजींग कौन्सील सदस्य,रयत शिक्षण संस्था, सातारा.१९९९- हंगामी सभापती, महाराष्ट्र राज्य विधानसभा, मुंबई.१९७५-१९७६- अध्यक्ष, इंडियन शुगर इंडस्ट्रीज इंपोर्ट ऍ़ण्ड एक्सपोर्ट कॉर्पाेरेशन लि. नवी दिल्ली., १९७७-१९७९- खंडकरी शेतकऱ्यांच्या आंदोलन त्यात तीन महिने विसापुर कारावास शिक्षा. १९७५ ते आजपर्यंत- संस्थापक संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट मांजरी बुद्रुक, जि. पुणे.१९७४ ते २०१४-संचालक, इंडियन शुगर इंडस्ट्रीज इंपोर्ट ऍ़ण्ड एक्सपोर्ट कॉर्पाेरेशन लि. नवी दिल्ली.१९७५-१९८०- संस्थापक अध्यक्ष, नॅशनल हेवी इंजिनियरींग को. ऑप. लि. पुणे.१९७५ -संस्थापक, गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघ
१९८१-१९८८- संस्थापक अध्यक्ष, नॅशनल हेवी लि. पुणे.१९८३-१९८४-संस्थापक अध्यक्ष, संजीवनी एज्युकेशन सोसायटी, १९८३-१९८४- अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लोकनाटय समिती, मुंबई.१९८३-१९८४-संचालक,- संचालक, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक लि.१९८६ – संस्थापक अध्यक्ष, यशवंत कुक्कूट पालन संस्था, कोपरगांव, फ्रंट पेज रंगीत,१९८९-१९९० – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी मुद्रणालय, पुणे.१९९० -मंत्री, कृषि व फलोत्पादन, सहकार महाराष्ट्र राज्य,मुंबई.१९९१- मंत्री, महसुल, महाराष्ट्र राज्य, मुंबई.१९९२-१९९३ -मंत्री, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क,कमाल जमीन धारणा, महाराष्ट्र राज्य, मुंबई.१९९६ -संस्थापक अध्यक्ष, देवयानी बँक,१९९२ – संस्थापक, संजीवनी सैनिकी ट्रेनिंग सेंटर,.२००६ते २०१२-व्हा. चेअरमन, नॅशनल फेडरेशन को. ऑप. शुगर फॅक्टरीज्,.नविदिल्ली. २०१२-२०१४-संचालक, नॅशनल फेडरेशन, नविदिल्ली.२०००ते २००४-सदस्य, महाराष्ट्र राज्य विधानसभा नियम समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक उपक्रम समिती, मुंबई.२००० -संस्थापक अध्यक्ष, इंटरनॅशनल फोरम फॉर इंडियन ऍ़ग्रीकल्चर, कोपरगांव, २००१ -सदस्य, महाराष्ट्र शासन जागतिक व्यापार आंतरराष्ट्रीय शेती करार कार्यकारी कृती गट, मुंबई.२००१-२००४ -सदस्य, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विनियमन सुधारणा विधेयक संयुक्त समिती, मुंबई.२००१-२००४- अध्यक्ष, ऊर्जा, उद्योग, रोजगार हमी स्थायी समिती महाराष्ट्र विधानसभा, मुंबई.२००३ -सदस्य, शासकीय व अशासकीय विधेयक समिती, महाराष्ट्र विधानसभा, मुंबई.२००३-२००४- सदस्य, सार्वजनिक उपक्रम समिती महाराष्ट्र विधानसभा, मुंबई.२००३-२००४ -सदस्य, वीजमंडळ एक्सपर्ट कमिटी,महाराष्ट्र विधानसभा मुंबई.२००३ -सचिव, गोदावरी कालवे, नांदुरमध्यमेश्वर जलद कालवा पाटपाणी संघर्ष समिती, कोपरगांव. २००४-२०१२ -ऊपाध्यक्ष, श्री. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी,.२००७-२०१० -सदस्य, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नविदिल्ली.२०१७-२०२० पर्यंत -उपाध्यक्ष, रयत शिक्षण संस्था सातारा.
चौकट
ज्ञान ही संपत्ती आहे व त्यातून संपत्ती निर्माण होते…. हा अत्यंत साधा विचार भारताचे जगविख्यात शास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय किर्तीचे पेटंट संशोधक डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांनी सांगितला. या साध्या विचाराने शंकरराव कोल्हे यांच्या मनात घर केलं आणि त्यांनी ग्रामीण अर्थकारणात शेतकऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते, त्यांच्या शेतीचे उत्पादन वाढीचा मंत्र विकसित करण्यात अतोनात प्रयत्न केले.