कोपरगाव : राष्ट्रीय लोकअदालतीत साडे सहा हजार दावे निकाली; साडे तीन कोटी वसुली

कोपरगाव : राष्ट्रीय लोकअदालतीत साडे सहा हजार दावे निकाली; साडे तीन कोटी वसुली

Kopargaon: Six and a half thousand claims settled in National Lok Adalat; Three and a half crore recovered

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Sun 13 Mar 2022 20:,33Pm.

कोपरगाव : जिल्हा न्यायालयासह
सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी (दि.१२) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत कोपरगाव न्यायालयाने सर्वाधिक दावे निकाली काढली आहे़त. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. कराळे यांच्या आवाहनाला पक्षकारांनी प्रतिसाद देत ६ हजार ३७९ प्रकरणांमध्ये तडजोड करून आपसातील वाद मिटविला आहे़. यामध्ये दावा दाखलपूर्व ६ हजार २८९ प्रकरणे, तर न्यायालयातील प्रलंबित एक हजार ९० प्रकरणांचा समावेश आहे़. विशेष म्हणजे या राष्ट्रीय लोकअदालतीत ३ कोटी ४५ लाख ४२ हजार ३१७ रुपयांच्या तडजोड रकमेची वसुली झाली. अशी माहिती सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी दिली.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. कराळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पक्षकारांच्या संमतीने जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वर्षानुवर्षांपासून न्यायालयात खेटा मारणाऱ्या पक्षकारांना आपसात समझोता करण्यासाठी लोकअदालतीच्या सुवर्णसंधीचा लाभ मिळावा यासाठी त्यांचा प्रयत्न होता.

शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी ९० प्रकरणे, तर दावा दाखल पूर्व ६ हजार २८९ प्रकरणे अशी एकुन ६ हजार ३७९ ठेवण्यात आली होती.

यात नगरपालिका, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, मोटार अपघात, एनआय अ‍ॅक्ट, बॅंका, पतसंस्था, सोसायट्या आदींची प्रकरणे होती.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. कराळे,न्यायाधीश श्रीमती. एस.एन. सचदेव मॅडम, न्यायाधीश व्ही.यू. मिसाळ सर,न्यायाधीश जे.एम. पांचाळ सर,न्यायाधीश ए.सी. डोईफोडे सर,न्यायाधीश आर.ए. शेख सर, न्यायाधीश एल.एम. सय्यद सर, सरकारी वकील ॲड.अशोक वहाडणे, ॲड.जयंत जोशी ॲड. शंतनू धोर्डे, ॲड. नितीन गंगावणे ॲड. बाळासाहेब कडू, ॲड. गौरव गुरसळ, ॲड. मिलिंद गुजराती, ॲड. अशोक टुपके, ॲड. श्रद्धा जवाद ॲड. पीसी धाडीवाल ॲड. योगेश जाधव,ॲड.एस के. जाधव,ॲड. आर. के. शेख,ॲड. नितीन जोशी ॲड. वैभव शिंदे, कोपरगाव वकील संघ, शहरातील नामांकित वकील, न्यायालयीन कर्मचारी यांचे परिश्रम तसेच वकील व पक्षकारांनी केलेल्या सहकार्यामुळे राष्ट्रीय लोकअदालतीत ६ हजार ३७९ दावे निकाली काढण्यात यश मिळाले आहे़.

न्यायासाठी वर्षानुवर्षे तिष्ठत बसलेल्यांसाठी राष्ट्रीय लोकअदालत ही सुवर्णसंधी असून, पक्षकारांनी याचा लाभ घेतला आहे़ यापुढील लोकअदालतींनाही पक्षकारांना चांगला प्रतिसाद दिल्यास न्यायालयावरील ताण कमी होईलच शिवाय न्यायही झटपट मिळेल़.

Leave a Reply

You cannot copy content of this page