शंकरराव कोल्हे पंचतत्वात विलीन झाले, थोरला मुलगा नितीन कोल्हे यांनी अग्नी दिला
Shankarrao Kolhe merged into Panchatatva, the eldest son Nitin Kolhe gave fire
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, आकाशातून पुष्पवृष्टीFuneral in Government Itamam, showering of flowers from the sky
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Wed 16 Mar 2022 19:,00Pm.
कोपरगाव : गेली सात दशके राज्यातील कष्टकरी, शेतकरी, साखर कामगार, व सहकारांचा बुलंद आवाज बनून अन्यायाविरुद्ध झुंज देत असंख्य लढे उभारणारे सहकार चळवळीचे अर्ध्वयू ज्येष्ठ नेते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात शिंगणापूर येथील संजीवनी इंजीनियरिंग कॉलेजच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. शोकाकुल वातावरणात शंकरराव कोल्हे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे चिरंजीव नितीन कोल्हे यांनी पार्थिवाला अग्नी दिला.
प्रशासनाच्या वतीने मानवंदना आणि बंदूकीच्या ३ फैरी झाडून ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हेलीकॉप्टर मधून त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे पार्थिव सकाळी दहा वाजेच्या सुमारास नाशिक येथून त्यांच्या राहत्या घरी येसगाव येथे वस्तीवर आणण्यात आले त्या ठिकाणी सर्व धार्मिक विधी पार पाडून दुपारी १ वाजता कोपरगाव शहर मार्गे सहकार महर्षी कारखाना कार्यस्थळावर दुपारी दोन ते चार वाजेच्या दरम्यान अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अंत्यविधीसाठी संजीवनी अभियांत्रिकी कॉलेजच्या मैदानावर आणण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरीकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सहकार महर्षी शंकरराव यांच्या निधनाबद्दल राज्यासह कोपरगाव शहर व तालुक्यात शोककळा पसरली असून कोपरगाव शहर संध्याकाळपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.
परिसरातील ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी रिक्षा टॅक्सी सेवा सुरू ठेवली होती.
बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास शंकरराव कोल्हे यांच्या पार्थिवावर संजीवनी अभियांत्रिकीच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंत्रोच्चाराच्या वेळी त्यांचा मोठा मुलगा नितीन कोल्हे यांनी अग्नी दिला. त्यांच्या स्मरणार्थ पोलिसांनी मानवंदना दिली.
यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,माजीमंत्री राधाकृष्ण विखे , विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजीमंत्री राम शिंदे, ना. आशुतोष काळे आमदार अनिल आहेर, आमदार मोनिका राजळे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राजेंद्र वाजे, संभाजी फाटके, प्रदिप वळसे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, कृपाशंकर सिंह, काका कोयटे, कैलासशेठ ठोळे, सत्येन मुंदडा, रवीकाका बोरावके, राजेश परजणे,
शंकरराव कोल्हे यांचे बंधू दत्तूनाना कोल्हे, सुरेश कोल्हे,पत्नी सिंधुताई, नितीन, बिपीन, डॉ. मिलींद ही तीन मुले, मुलगी निलीमा वसंतराव पवार, सुना सौ.कलावती, सौ. स्नेहलता, सौ.अनिता, नातवंडे अमित, सुमित, विवेक, व ईशान कोल्हे, नात सुना सौ. मनाली, सौ. निकिता सौ.रेणुका,पतवंडे राजविका, शांकरी, शिवांश, संपूर्ण कोल्हे परिवार तिथे उपस्थित होते.
जिल्ह्यासह तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक कृषी सरकार या संस्थांचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर यासह हजारो चाहते त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचले होते.
बुधवारी १६ मार्च रोजी पहाटे साडेचार वाजता नाशिक येथील सुश्रुत हॉस्पीटल येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. २४ मार्च २०२२ रोजी ९४ वा वाढदिवस होता. वाढदिवसाला अवघे ५ दिवस शिल्लक होते. त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले आहे.