शंकरराव कोल्हे: शेतकऱ्यांसाठी रिझर्व्ह बँकेविरोधात जनआंदोलन करणारा पहिला नेता – सदाशिव लोखंडे
Shankarrao Kolhe: The first leader to agitate for farmers against RBI – Sadashiv Lokhande
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Fir18 Mar 2022 13:30Pm.
कोपरगांव: माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे सहकार, कृषी, शिक्षण, महसूल, सांस्कृतिक, जलसमृद्धी साखर कारखानदारी, खंडकरी शेतकरी या क्षेत्रातील काम उल्लेखनीय असून शेतकऱ्यांचे व्याज कमी करावे यासाठी थेट मुंबई रिझर्व्ह बँकेवर रुमणे मोर्चा नेऊन ऐतिहासिक जनआंदोलन करणारा पहिला नेता होता. त्यांची ही लढाऊवृत्ती पुढच्या पिढीला कायम प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे यांनी केले.
तालुक्यातील येसगाव कोल्हे वस्ती येथे सदाशिव लोखंडे यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांचे प्रतिमेचे पुजन करून सिंधुताई कोल्हे,निलीमा वसंतराव पवार, नितीन, बिपीन, डॉ. मिलिंद कोल्हे सौ. स्नेहलता कोल्हे,सौ. कलावती कोल्हे, अमित, सुमित व विवेक कोल्हे या कुटुंबियांची शुक्रवारी सांत्वनपर भेट घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
खा. सदाशिव लोखंडे म्हणाले , शंकरराव कोल्हे यांनी साखर कामगार असतील किंवा खंडकरी शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी लढा दिला, रिझर्व्ह बँकेवर रुमणे मोर्चा नेऊन त्यांनी त्या काळात रिझर्व बँकेला शेतकऱ्यांचे अर्धा टक्के व्याज कमी करण्यास भाग पाडले होते. इतिहासात याची नोंद झाली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सुपुत्र व राज्याचे नेते शंकरराव कोल्हे ज्यांनी सहकार क्षेत्राचा शेतकऱ्यांना खरा उपयोग करुन दिला आहे. त्यांच्या निधनामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे नुकसान झाले आहे त्याचबरोबर राज्याचे नुकसान झाले आहे. म्हणून महा विकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचा खासदार म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असे ते म्हणाले,
यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,ग्रामीण उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, उपनगराध्यक्ष योगेश बागुल तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब राहणे, माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, माजी शहरप्रमुख सनी वाघ, ग्राहक संरक्षण कक्ष शहराध्यक्ष रवी कथले, सागर जाधव, नितीश बोरुडे, सिद्धार्थ शेळके, आशिष निकुंभ, ज्ञानेश्वर गोसावी, पप्पू पडियार, कुणाल लोणारी आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.





