साडेतीन दशकांची परंपरा; मुंबादेवी मंडळाचा ‘नवनाथ कथासार’ भक्तीने बहरला

साडेतीन दशकांची परंपरा; मुंबादेवी मंडळाचा ‘नवनाथ कथासार’ भक्तीने बहरला

A Tradition Spanning Three and a Half Decades: Mumbadevi Mandal’s ‘Navnath Kathasar’ Blossoms with Devotion

हाव, दुःख आणि नात्यांपलीकडे भगवंतच खरा आधार”-शिरीष महाराज 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 22Sun.18.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : रामनवमी निमित्त मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित ‘नवनाथ भक्ती कथासार’ या त्रिदिवसीय प्रवचनमालेत अध्यात्म, जीवनतत्त्व आणि भक्तीचा संगम अनुभवायला मिळाला. हरिद्वार येथील आचार्य प.पू. शिरीष महाराज यांनी तीनही ‘पुष्पां’मधून संसारातील वास्तव आणि भगवंतभक्तीचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

पहिल्या पुष्पात त्यांनी “सुख भोगणे सोपे, पण दुःख पचविणे कठीण” असे सांगत रावण व अभिमन्यूच्या उदाहरणातून अहंकार, एकटेपणा आणि जीवनातील ठेचांचे महत्त्व अधोरेखित केले. दुसऱ्या पुष्पात “मनुष्याच्या इच्छा कधीही संपत नाहीत; पोट भरले तरी हाव शमत नाही,” असे सांगत प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची ताकद फक्त परमेश्वराकडेच असल्याचे स्पष्ट केले. कितीही संकटे आली तरी नामस्मरण आणि नवनाथ भक्ती हा सहज व तारक मार्ग असल्याचा संदेश त्यांनी दिला.

तिसऱ्या पुष्पात “धनदौलत असेपर्यंतच नाती टिकतात; शेवटपर्यंत भगवंतच सोबत असतो,” असे ठामपणे सांगत गोसेवा, साधी भक्ती आणि श्रद्धेचा मार्गच खरे समाधान देतो, असे आवाहन केले.

गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या या सोहळ्याचा प्रारंभ साईबाबा प्रतिमेच्या पूजनाने झाला. प.पू. रमेशगिरी महाराज, परमानंद महाराज तसेच शिक्षकवृंद यांच्या हस्ते आरती करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी रामरक्षा, हनुमान चालीसा पठण व प्रश्नमंजुषा स्पर्धेत ५६०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदला गेला असून, बक्षीस वितरण २२ मार्च रोजी होणार आहे.

त्रिदिवसीय ‘नवनाथ कथासार’मधून शिरीष महाराजांनी दिलेला “भक्तीतूनच जीवनाला दिशा” हा संदेश भाविकांच्या मनावर अधोरेखित झाला.

Leave a Reply

You cannot copy content of this page