ना. काळेंच्या पाठपुराव्यामुळे कालव्याच्या दुरुस्ती कामाला गती – ना. जयंत पाटील
No. Speed of canal repair work due to black pursuit – no. Jayant Patil
अधिवेशनात ना. काळे यांच्या पाठपुराव्याचा उल्लेखNo in the convention. Mention of Kale’s pursuit
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Fir 25 Mar 2022 20:40Pm.
कोपरगाव : अधिवेशनात कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा देखील प्रश्न चर्चिला गेला आहे. ना. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे जलसंपदा विभागाने डावा तट कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती दिली असल्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी सभागृहात आवर्जून सांगितले आहे.
मतदार संघातून वाहणाऱ्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांचे आयुर्मान ११५ वर्षापेक्षा जास्त झाले आहे. त्यापैकी ९० किलोमीटरपर्यत वाहत जाणाऱ्या गोदावरी डावा तट कालव्याची तर अवस्था अत्यंत वाईट झाली होती. ३७९ क्युसेक्सने वाहण्याची क्षमता असणाऱ्या डाव्या तट कालव्याला १५० क्युसेक्स पाणी जास्त होत असल्यामुळे अनेकवेळा कालवा ठिकठिकाणी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी ना. आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याबाबत जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी अधिवेशनात ना. आशुतोष काळेंचा स्पष्टपणे उल्लेख करून अन्न पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ हे देखील आग्रही असल्याचे सभागृहात सांगितले. त्यामुळे जलसंपदा विभागाने गांभीर्याने दखल घेवून डाव्या तट कालव्याच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून डाव्या तट कालव्यावरील ३६४ स्ट्रक्चर्स पैकी १२१ बांधकामे विशेष दुरुस्ती अंतर्गत पूर्ण केली आहेत. २२ कामांना ७५.८७ कोटी निधीच्या कामांना २०२१ मध्ये प्रशासकीय मान्यता देवून कामे सुरु करण्यात आली आहेत. चालू आर्थिक वर्षात ३३ कोटी निधीची तरतूद करून या कामांच्या देखील निविदा प्रक्रिया प्रगतीत आहे. ना. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून डाव्या तट कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला मोठी गती मिळाली आहे.
पुढील दोन वर्षापर्यंत डाव्या तट कालव्याचे दुरुस्तीचे बहुतांश प्रश्न कमी होणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे महत्वाची समस्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्यात ना. आशुतोष काळे यांना यश मिळाले आहे.
डाव्या तट कालव्याच्या दुरुस्तीला प्राधान्य देणाऱ्या जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, त्याबाबत पाठपुरावा करणाऱ्या ना. आशुतोष काळे यांचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आभार मानले आहे.