शंकरराव कोल्हेंची कृती चंद्रसूर्य असेपर्यंत राहील-ह. भ. प. उध्दव महाराज मंडलिक
Shankarrao Kolhe’s action will remain as long as Chandrasurya- Uddhav Maharaj Mandlik
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Fir 25 Mar 2022 20:30Pm.
कोपरगाव : माजीमंत्री शंकरराव कोल्हे स्वतःपेक्षा समाजाच्या भल्यासाठी आयुष्यभर झिजले, त्यांच्या कृती चंद्र, सुर्य असेपर्यंत राहतील त्या कधीच पुसल्या जाणार नाहीत,असे प्रतिपादन ह. भ. प. उध्दव महाराज मंडलिक यांनी शंकरराव कोल्हे यांच्या दशक्रिया विधी श्रद्धांजली प्रवचन कार्यक्रमात संजीवनी अभियांत्रिकी मैदानावर केले.
मंडलिक महाराज पुढे म्हणाले व्रतस्थ सत्पुरूष म्हणून शंकरराव कोल्हे यांचा जिल्हयात नव्हे तर देशभर लौकीक होता. स्वप्रपंचापेक्षा त्यांनी समाज प्रपंच करत लाखो कुटूंबे उभी केली, त्याकाळी समाजात शिक्षणाची अनास्था असतांनाही वडील गेनूजी कोल्हे यांनी शंकरराव कोल्हेंना ज्ञानाच्या शिदोरीवर घडविले, कोल्हेंची संजीवनी ऊर्जा या परिसराच्या भल्यासाठी सर्वांना अखंडपणे मिळत राहिल, शेवटी अनंताच्या प्रवासाला जातांनाही त्यांची आशिर्वादाची झोळी भरलेली होती तेंव्हा सर्वांनी स्वत:पेक्षा समाजासाठीच्या कामाला प्राधान्य द्या हा मुलमंत्र त्यांना ख-या अर्थाने श्रध्दांजली ठरेल, याप्रसंगी सिंधुताई कोल्हे, बंधु दत्तात्रय कोल्हे, नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलीमा वसंतराव पवार, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, डॉ. मिलींद कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयुटचे कार्यकारी विश्वस्थ अमित कोल्हे, संजीवनी फाउंडेशन चे सुमित कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, प्रणव वसंतराव पवार, वेदांग मिलींद कोल्हे, ईशान कोल्हे, डॉ. प्राची वसंतराव पवार, अमृता वसंतराव पवार यांच्यासह संपुर्ण कोल्हे परिवार, माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप, आप्पासाहेब दवंगे, सर्व आजी माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, संपुर्ण राज्यभरातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, कर्मयोगी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी उभ्या केलेल्या परिवाराला कधीही अंतर देणार नाही, त्यांच्या शिकवणुकीची जपवणूक करत गोरगरीब दीन दुबळयांच्या सेवेसाठी समर्थपणे काम करीत राहिल अशा महापुरूषाचा सहवास आपल्याला लाभला हे भाग्य आहे.
मंडलिक महाराज पुढे म्हणाले, अहमदनगर जिल्हा हा पंतप्रधानपदी काम करणा-या नवरत्नांची खाण आहे. शंकरराव कोल्हे यांनी वयाच्या २१ व्या वर्षापासून सुरू केलेला समाज प्रवास आताच्या त्यांच्या तिस-या पिढोपर्यंत सुरूच आहे आणि तो असाच पुढे मार्गस्थ होईल. शंकरराव कोल्हे यांच्याकडे स्वतःपेक्षा इतरांच्या कामाचीच यादी मोठी होती. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, कोडा आदि क्षेत्रात त्यांचे काम प्रचंड आहे त्याचबरोबरच अध्यात्माचा महामार्गही त्यांनी सांभाळला असेही ते म्हणाले. शेवटी ह. भ. प. बाळकृष्ण महाराज सुरासे यांनी पसायदान म्हटले.
चौकट
सरालाबेटाचे महंत नारायणगिरी महाराज आणि माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचा जिव्हाळयाचा संबंध होता. त्यांची आज पुण्यतिथी आहे. शंकरराव कोल्हे यांचे वाचन अफाट होते. भक्ती आणि शक्तीच्या संगमात ते महाराजांबरोबर आलेल्या सर्वसामान्यांचीही काळजी घेत असे ह.भ.प. उध्दव महाराज मंडलिक म्हणाले.