शहराच्या अतिक्रमणाचं पाप माथी मारू नका – कहार

शहराच्या अतिक्रमणाचं पाप माथी मारू नका – कहार

Don’t blame the city for the encroachment – Kahar

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Fir 25 Mar 2022 20:50Pm.

कोपरगाव :  अतिक्रमणाबाबत भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांनी राष्ट्रवादी शहराध्यक्षावर केलेल्या आरोपाचे खंडन करताना कोपरगाव शहरातील अतिक्रमण नगरपरिषद प्रशासनाने काढले आहे. परंतु अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आणायचे काम कुणी केले? असा सवाल करत तुमचे पाप दुसर्‍याच्या माथी मारू नका असा इशारा राष्ट्रवादीचे उपशहराध्यक्ष धनंजय कहार यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

याबाबत अधिक खुलासा करताना कहार यांनी पत्रकात म्हटले आहे की, व्यावसायिकांना रस्त्यावर वाहतुकीसाठी अडचण निर्माण करू नये अशी विनंती केली होती. मात्र काही दुकानदार आपले दुकान असतांना देखील रिकाम्या जागेवर अतिक्रमण करून वाहतुकीला अडचण निर्माण करीत होते. त्यामुळे आमची हि नियमित कारवाई असल्याचे कोपरगाव नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. परंतु कोणत्याही गोष्टीत राजकारण करायची सवय असलेल्या विरोधकांनी कुठलाही संदर्भ कुठेही जोडून व्यवसायिकांच्या मनात विष पेरण्याचे काम करत आहे.

वास्तविक पाहता आजच्या परिस्थितीत अशा प्रकारचे कुटील राजकारण करणे योग्य नसतांना आपल्या कार्यकर्त्यांमार्फत ना. आशुतोष काळे व काळे कुटंबाबद्दल नागरिकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरविला जात आहे. त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नये यासाठी खुलासा करावा लागत आहे. असेही कहार यांनी पत्रकात म्हटले आहे. कोपरगाव शहरात सर्वात जास्त अतिक्रमण कुणाची आहेत याची शहरातील नागरिकांना चांगली कल्पना आहे. कोपरगाव शहरात अतिक्रमणावरून वाद कुणाचे झाले आहे हे त्यांनी सांगावे.

तसेच शहरातील अतिक्रमण काढावे म्हणून कोपरगाव नगरपरिषदेकडे अर्ज कुणी केले हे पण त्यांनी सांगितले पाहिजे. उगाचच पराचा कावळा करून नागरिकांमध्ये विष पेरण्याचे काम करू नये. काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण काढल्याच्या रागातून पालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण आली होती. त्यामुळे अतिक्रमणाच्या मुद्याने उचल खाल्ली व त्याची मोठी किंमत आज हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना मोजावी लागत आहे.

त्यामुळे कोपरगाव नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून काढण्यात येत असलेले अतिक्रमण मुद्द्यावर, राजकारणाची पोळी भाजू नका असा तुलाही शेवटी पत्रकातून कहार यांनी कुरेशी यांना लगावला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page