नाटेगाव सोसायटी चेअरमन मोरे व्हा. चेअरमनपदी सौ. पिंगळे यांची बिनविरोध निवड
Be more Nategaon Society Chairman. Mrs. as Chairman. Unopposed selection of Pingale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Mon 28 Mar 2022 19 :00Pm.
कोपरगाव : तालुक्यातील नाटेगाव विविध सेवा सोसायटी चेअरमनपदी काळे गटाचे गणेश वसंतराव मोरे यांची तर व्हा. चेअरमनपदी सौ. भारती राऊसाहेब पिंगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मागील ३८ वर्षापासून काळे गटाच्या ताब्यात आहे.
माजी आमदार अशोक काळे व ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या निवडणुकीत काळे गटाचे १० सदस्य निवडून येवून पुन्हा एकदा सोसायटीवरील काळे गटाने सत्ता राखली आहे.
चेअरमन, व्हा. चेअरमनपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज मुदतीच्या आत दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी आर.एन गांगुर्डे यांनी गणेश वसंतराव मोरे यांची चेअरमनपदी तर सौ. भारती राऊसाहेब पिंगळे यांची व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
निवडणूक कामी सोसायटीचे सचिव दत्तात्रय वाघ यांनी मदत केली. यावेळी उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित संचालकांनी व काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
मोरे बाळू पोपट, मोरे सतीश कारभारी, मोरे अंबादास धोंडीबा, मोरे घमा सुकदेव, सौ. मोरे लीलाबाई तान्हाजी, सौ. मोरे रंजना रघुनाथ, मोरे संतोष इंद्रभान, भालके भरत छबुराव आदी सदस्यांसह काळे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन व्हा.चेअरमन यांचे माजी आमदार अशोक काळे व ना.आशुतोष काळे यांनी अभिंनदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.