अण्णाभाऊ साठे स्मारकाचं लोकार्पणाआधीच अनावरण
Unveiling of Annabhau Sathe memorial before public offering
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Tue 29 Mar 2022 20 :10Pm.
कोपरगाव : कोपरगाव शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे अनावरण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ६ एप्रिल रोजी होणार असल्याचे चर्चा सुरू असताना मंगळवारी दुपारी साडेचार पाच वाजेच्या सुमारास स्वाती त्रिभुवन व शरद त्रिभुवन दाम्पत्याने त्याआधीच स्मारकाचे अनावरण केलं यामुळे स्मारकाच्या लोकार्पण सोहळा वरून नवीन वाद उफळला आहे.
मंगळवारी (२९) दुपारी शहरातील मुख्य रस्त्यावर अच्छादित असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती स्मारकाच्या चौथर्यावर चढुन कार्यकर्त्या स्वाती शरद त्रिभुवन यांनी अच्छादनाने झाकलेले स्मारक खुले केले व पुष्पहार घालून फुले उधळून अभिवादन केले याची बातमी शहरात पसरताच काही वेळ तणाव निर्माण झाला होता परंतु पोलीस आल्यानंतर त्रिभुवन कुटुंबाला पोलिस पोलीस स्टेशनला घेऊन गेले दरम्यान अण्णाभाऊ साठे स्मारक पुन्हा आच्छादन टाकून झाकण्यात आले. या प्रकरणी आता पोलिसांनी त्रिभुवन दांपत्याला ताब्यात घेतले असून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या अनेक वर्षापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तयार करण्यापासून ते बसवण्यापर्यंत मोठा कालावधी लोटला होता सदर पूर्णाकृतीपुतळा २६ डिसेंबर २०२१ रोजी वाजत गाजत स्थानापन्न करण्यात आला होता, मात्र आचारसंहिता व इतर कारणाच्या मुळे तो अच्छादित करून ठेवण्यात आला आहे, त्यास सुमारे तीन महिन्याचा कालावधी होऊन अधिक काळ लोटल्याने सदर पुतळा खुला करावा म्हणून स्वाती शरद त्रिभुवन यांनी आज थेट पुतळ्या वर जाऊन त्याचे आच्छादन काढून पुष्पहार घालून तो खुला केला. साडेचार ते पाच वाजे दरम्यान ही घटना घडली. स्वाती ह्या लहुजी टायगर सेनेचे संस्थापक शरद त्रिभुवन यांच्या पत्नी आहेत, माझ्या मनात होतं ते मी केले असे त्रिभुवन म्हणाल्या. पुतळा खुला केल्याचे समजताच समाज बांधव कार्यकर्ते पुतळ्या भोवती जमले ,त्यांनी त्रिभुवन यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ऐकले नाही, तेथे शाब्दिक चकमकी यावेळी झडल्या, त्यामुळे या गोष्टीचा त्यांनी निषेध केला, ही माहिती समजतात पोलिसांनी त्रिभुवन यांना ताब्यात घेतले. व परत पुतळ्याला आच्छादित करून ठेवण्यात आला,
साठे पुतळा व्हावा म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती ती नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे गेली, मात्र सदर पुतळा झाकलेल्या अवस्थेत ठेवल्यामुळे तो किती दिवस झाकून ठेवायचा पुतळा जनतेसाठी खुला करा असे तमाम समाज बांधव जनतेचे मत आहे. मात्र तो खुला करण्याबाबत तारखावर तारखा पडत आहेत पालिकेवर प्रशासक राज आहे प्रशासना पुढे अडचणी आहेत, साठे यांच्या पुतळ्याचे येत्या २ एप्रिल रोजी आम्ही समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते सुखदेव जाधव यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्ता उद्घाटन करणार आहोत तशी बैठक आज समाज बांधवांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात झाल्याची माहिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विनोद राक्षे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. दरम्यान उपमुख्यमंत्री हे कोपरगाव दौऱ्यावर विविध उद्घाटन करण्याकरता येणार असल्याचे समजते त्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे ही त्यांनी अनावरण करावे म्हणून घाट घातला जात आहे. मात्र आम्ही पवार यांच्या हस्ते उद्घाटनास मान्यता देणार नाही असे राक्षे यांनी ठाम पणे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या पार्श्वभूमीवर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. या झालेल्या प्रकाराबाबत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.