शहरातील अतिक्रमणात उध्वस्त झालेल्या विस्थापितांची विवेक कोल्हे यांच्याकडून विचारपूस
Vivek Kolhe interviews the displaced people who were devastated by the encroachment in the city
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Tue 29 Mar 2022 20 :20Pm.
कोपरगाव: शहरातील बहुतांशी अतिक्रमणे भुई सपाट झाल्यानंतर आधीच कोरोनामुळे हातबल झालेले गोरगरीब अतिक्रमण धारक धास्तावले आहेत, त्या विस्थापित टपरीधारकांची आज युवक नेते व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करत सहानभूतीपर भेट घेतली.
ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नुकतेच निधन झाले त्यांचे सर्व विधी उरकल्यानंतर त्यांचे नातू विवेक कोल्हे यांनी आज कामास सुरुवात केली, विस्थापित टपरीधारकांची भेट घेतली. आस्थेने विचारपूस केली. विस्थापितांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
विनोद राक्षे यांच्या बुलेटवर बसून विवेक कोल्हे यांनी शहरात पाहणी केली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, विजय आढाव, कैलास जाधव, पप्पू पडियार, रंजन जाधव विनोद राक्षे दत्ता काले यांच्यासह नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.