अतिक्रमणातील विस्थापितांना हॉकर्स झोन द्या- राष्ट्रवादी कॉंग्रेस

अतिक्रमणातील विस्थापितांना हॉकर्स झोन द्या- राष्ट्रवादी कॉंग्रेस

Give Hawkers Zone to Encroachment Displaced- Nationalist Congress

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Wed 30 Mar 2022 20 :00Pm.

कोपरगाव :नगरपरिषदेच्या वतीने शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यात येत आहे. त्यामुळे या जागेवर छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या असून अशा अतिक्रमणात काढण्यात आलेल्या गोरगरीब व्यावसायिकांसाठी कोपरगाव नगरपरिषदेने  ‘हॉकर्स झोन’ तयार करावे अशा आशयाचे निवेदन नुकतेच कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेला देण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून नगरपरिषदेकडून कोपरगाव शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अतिक्रमण काढल्यामुळे गोरगरीब व हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना उदरनिर्वाहाचे दुसरे साधन राहिले नाही.त्यांच्यापुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून  गोरगरीब व्यावसायिकांसाठी  कोपरगाव नगरपरिषदेने  ‘हॉकर्स झोन’ तयार करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी स्विकारले.               

  यावेळी धरमचंद बागरेचा,  शहराध्यक्ष सुनील गंगूले,  विरेन बोरावके, मंदार पहाडे,  संदीप पगारे,  मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे,  सुनील शिलेदार,  नवाज कुरेशी, कार्तिक सरदार, फकीर कुरेशी आदींसह शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.          

 

Leave a Reply

You cannot copy content of this page