सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टची स्थापना-विवेक कोल्हे

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टची स्थापना-विवेक कोल्हे

Establishment of Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Ideology Trust – Vivek Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Thu 31 Mar 2022 16 :00Pm.

कोपरगांव: महाराष्ट्र राज्याचे सहकारमहर्षी व संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आदि विचारधारेची कार्यप्रणाली सुरू ठेवण्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टची स्थापना करण्यांत आल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.

ते म्हणाले की, स्व. शंकरराव कोल्हे यांनी परदेशात जाउन उच्च शिक्षण घेतले त्यातुन ते तेथेच उद्योजक होवु शकत होते पण ग्रामिण जनतेशी असलेली नाळ त्यांनी कायम ठेवत पुन्हा मायदेशी येवुन येथील शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रगतीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट पुणे, राज्य सहकारी साखर संघ मुंबई, नॅशनल हेवी पुणे, नॅशनल फेडरेशन दिल्ली, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, गोदावरी खोरे दूध संघ, कोपरगांव औद्योगिक वसाहत, साई संजीवनी सहकारी बॅक, संजीवनी सहकारी पतसंस्था, यशवंत कुक्कुट, संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्था आदि संस्था स्थापन करून नावलौकिक वाढवला, ग्रामिण अर्थकारणासह शिक्षण, सहकाराचे जाळे मजबूत करण्याचा विशेष प्रयत्न केला आहे., त्यांचे समाजकार्य दीपस्तंभाप्रमाणे उभे आहे. त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या विचारधारा ट्रस्टची कार्यप्रणाली आहे. आर्थीकदृष्टया मागास असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करून देणे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात योगदान असलेल्यांचा गौरव करणे, इतर सामाजिक कामे करणे या उद्देशाने त्यांच्या नावाने शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टची स्थापना करण्यात आली असल्याचे ते शेवटी म्हणाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page