अडीच वर्षात कोपरगाव विकासासाठी १००० कोटी निधी आणला- ना. आशुतोष काळे

अडीच वर्षात कोपरगाव विकासासाठी १००० कोटी निधी आणला- ना. आशुतोष काळे

Bring 1000 crore fund for Kopargaon development in two and half years. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Tue 5 Mar 2022,18 :00Pm.

कोपरगाव : विधानसभा मतदार संघाच्या विकासकामांसाठी अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारकडून १००० कोटीचा निधी आणला असल्याची माहिती श्री. साईबाबा संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी सेवा करण्याची संधी दिली. त्यावेळी मतदार संघाच्या विकासाचे मोठे आव्हान होते. शहर व ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज, गोदावरी कालव्यांच्या दुरुस्ती, असे अनेक प्रश्न  प्रलंबित होते. शरद पवार यांच्या पुढाकारातून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. दोन वर्षाचा काळ जरी कोरोना संकटात गेला.  तरीही मतदार  संघाच्या विकासासाठी तब्बल १००० कोटी रुपयांचा निधी आणला आहे.

यामध्ये अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या एन.एच. जी ७५२ या महामार्गाच्या हस्तांतरण करून या  सावळीविहीर ते कोपरगाव रस्त्यासाठी १७८ कोटी निधी, कोपरगाव शहराचा साठवण तलावाला  १३१.२४ कोटीची प्रशासकीय मंजुरी,. काकडी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटी, मतदार संघातील रस्त्यांसाठी १४० कोटी,  ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी ९५ कोटी, गोदावरी कालवे दुरुस्तीसाठी  ३०० कोटीची मंजुरी, पैकी ५५ कोटी निधी मिळाला, मोडकळीस आलेल्या शासकीय इमारतीसाठी ९५ कोटी, मतदार संघातील विविध पुलांसाठी २२ कोटी निधी, आणला असून अस्मानी संकटाच्या नुकसानीपोटी मदत पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन कडून ४५ कोटी मदत, मतदार संघातील अनेक देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देवून ३.२० कोटी निधी, दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत ०२ कोटी. तांडा सुधार योजने अंतर्गत ०१ कोटी, कोपरगाव नगरपरिषद इमारत ०२ कोटी, स्मशानभूमी कब्रस्थान समाज मंदिर साठी १३ कोटी आणि दलित वस्ती साठी २.३१ कोटी व मतदार संघातील इतर विकासकामांसाठी ६६ कोटी अशा प्रकारे अडीच वर्षाच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जवळपास १००० कोटी निधी मतदार संघाच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारकडून आणला आहे.

भविष्यात देखील मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणून उर्वरित विकासकामांचा निपटारा करायचा आहे. त्यासाठी प्रत्येक गावांत स्मशानभूमी, पाणी योजना व वीज व्यवस्था करण्याचा संकल्प, मंजूर बंधाऱ्याचे कायमस्वरूपी नुतनीकरण, सबजेल व मुलांचे व मुलींचे वस्तीगृह उभारणे, आदिवासी भवन उभारणे, कोपरगांव शहरातील नदी संवर्धन योजने अंतर्गत घाट सुशोभीकरण करणे, नवीन सब स्टेशन व रोहीत्रांची क्षमता वाढ करणे, महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी बचतगटांना बळकटी देणे, माजी सैनिक भवनउभारणे आदी महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न असून कोपरगाव बस स्थानक येथे व्यापारी संकुलासाठी व शहरात विविध ठिकाणी व्यापारी संकुल उभारणे साठी पाठपुरावा सुरु असून कोपरगांव रेल्वे स्थानकाला मध्यवर्ती रेल्वे स्थानक मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.२०२४ पर्यंत जास्तीत जास्त विकासकामे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

                    

Leave a Reply

You cannot copy content of this page