अडथळे आले तरी कोपरगावचा कायापालट करून दाखवीन – ना. आशुतोष काळे

अडथळे आले तरी कोपरगावचा कायापालट करून दाखवीन – ना. आशुतोष काळे

Even if there are obstacles, I will show the transformation of Kopargaon – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Mon 4 Mar 2022 16 :40Pm.

कोपरगाव : कोपरगाव शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्था योजनेला तांत्रिक मंजुरी ऑक्टोबर महिन्यातच मिळाली होती व प्रशासकीय मंजुरी देखील तातडीने मिळाली असती मात्र चांगल्या कामांना खोडा घालणाऱ्या वृत्तींमुळे काहीसा विलंब झाला असला तरी कोपरगावकरांचे आशिर्वाद माझ्यामागे खंबीरपने होते म्हणून हे काम होवू शकले. यापुढे देखील कोपरगाव शहराच्या विकास कामांना अडथळे येतील, मात्र असे कितीही अडथळे आले तरी कोपरगावकरांच्या आशीर्वादाने कोपरगावचा कायापालट करून दाखवीन अशी ग्वाही श्री साईबाबा संस्थानच्या विश्वत मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्था कामासाठी १३१.२४ कोटी रुपयांचा निधी मिळवून दिल्याबद्दल कोपरगाव महाविकास आघाडीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ना. आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.

ना.आशुतोष काळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी माझे प्रयत्न सूरु आहेत. त्याचाच एक भाग कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी महाविकास आघाडी सरकारकडून १३१.२४ कोटीच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळविली आहे. श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त व्यवस्थेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून श्री साईबाबा संस्थान, शिर्डी तसेच कोपरगाव मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारी विकासकामे करणार असल्याची ग्वाही दिली. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी एकत्रितपणे सर्वांच्या वतीने शहर विकासाचे चांगले काम करून दाखवू असा विश्वास मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायास ना. आशुतोष काळे यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी संपर्कप्रमुख उदयन दळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, शहरप्रमुख कलविंदरसिंग डडीयाल, जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page