लौकी सोसायटीच्या अध्यक्ष कोल्हे गटाचे खिलारी तर उपाध्यक्ष यमुना खटकाळे बिनविरोध
Khilari of Kolhe group and Yamuna Khatkale are unopposed
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Tue 5 Mar 2022,18 :20Pm.
कोपरगाव: तालुक्याच्या पुर्व भागातील लौकी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे बाबासाहेब माधवराव खिलारी तर उपाध्यक्षपदी यमुनाबाई रामराव खटकाळे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे आदिंनी अभिनंदन केले आहे.
लौकी सहकारी सोसायटीची निवडणुक नुकतीच पार पडली त्यात कोल्हे गटाचे सर्वश्री बाळासाहेब खिलारी, मंथन खिलारी, परिगाबाई साहेबराव डोंगरे, कांताराम आहेर, विजय कदम हे संचालक निवडुन आले. निवडणुक निर्णय अधिकारी सुनील क्षीरसागर यांनी काम पाहिले तर सहायक म्हणून सचिव साहेबराव निकाळे यांनी सहकार्य केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब खिलारी व उपाध्यक्ष यमुनाबाई खटकाळे यांच्या निवडीबददल त्रंबकराव सरोदे, सरपंच चांगदेव इंगळे, निलेश सरोदे, नवनाथ भवर, दत्तात्रय गोडसे, वसंतराव कदम, सुनिल कदम, दिगंबर गोडसे, शिवाजी जाधव, दादासाहेब खटकाळे, रविंद्र वल्टे, साहेबराव डोंगरे, अंबादास खटकाळे, कचरू कदम, सुभाष कदम, यशवंत कदम, विजय भवर, दत्तात्रय खटकाळे, रमेश खटकाळे, भाउसाहेब गोडसे, चांगदेव कदम, आण्णासाहेब खिलारी, अजय खिलारी, लक्ष्मण वल्टे, बाळासाहेब शिंदे, गुलाबराव देशमुख, माणिकराव देशमुख, निवृत्ती वल्टे, श्रीधर देशमुख आदिंनी अभिनंदन केले आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब खिलारी म्हणाले की, सभासद शेतक-यांच्या उन्नतीसाठी असणा-या सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू, उपाध्यक्ष यमुनाबाई खटकाळे म्हणाल्या की, पुर्व भागाच्या विकासासाठी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी मोठे काम केले असुन आता त्यांच्या तिस-या पिढीने देखील त्याच तळमळींने कोरोना आपत्तीत काम केले आहे. शेवटी सचिव साहेबराव निकाळे यांनी आभार मानले.