ना.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह प्रगतीच्या दिशेने- रोहोम

ना.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह प्रगतीच्या दिशेने- रोहोम

Towards Progress of Karmaveer Shankarrao Kale Industry Group under the leadership of Ashutosh Kale – Rohom

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Tue 5 Mar 2022,19 :20Pm.

कोपरगाव: कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच शेतकरी हिताची जपवणूक करण्याची परंपरा श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष व कारखान्याचे विद्यमान चेअरमन ना. आशुतोष काळे यांनी देखील सुरु ठेवली असून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व ना. आशुतोष काळे यांचं नेतृत्वाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व वेगाने प्रगतीच्या दिशेने गगनभरारी घेत असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी म्हटले आहे.

त्यानी पुढे असे म्हटले आहे की, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना माजी आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या आदर्श विचारांवर कारखान्याचा कारभार सुरु असून चालू कारखाना मागील काही वर्षापासून कारखाना तोटामुक्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या केडीट रेटिंग मानांकनानुसार कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. ऊस उत्पादक शेतकरी व कामगार तसेच कारखान्याशी संबंधित घटकांबाबत आजवर जी काही आश्वासने दिली आहेत त्या आश्वासनाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून अहमदनगर जिल्ह्यात एफ आर पी पेक्षा नेहमी जास्तीत जास्त ऊस दर देण्याची परंपरा कायम राखत शेतकऱ्यांचे हित जोपासत आहे.                  त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या कारखाना कर्मचारी व परिसरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची आर्थिक गरजा पूर्ण करणाऱ्या गौतम सहकारी बँकेने देखील खडतर परिस्थितीतून ना. आशुतोष काळे यांच्या नेतृत्व कौशल्यातून अडचणीच्या काळात देखील फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत भारतीय रिझर्व बँकेचे सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून चालू आर्थिक कोरोनाच्या संकटाला न जुमानता वर्षात २ कोटी १४ लाख रुपये निव्वळ नफा मिळविला आहे. आजमितीस बँकेचे वसूल भाग भांडवल ५००.९२ लाख असून बँकेकडे ९९ कोटी ७५ लाखाच्या ठेवी आहेत. बँकेने ६३ कोटी ५० लाख कर्जवाटप केले असून ४७ कोटी १२ लाख गुंतवणूक केली आहे. राखीव व इतर निधी १० कोटी ०८ लाख आहे.             

तसेच पद्मविभुषण डॉ. शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्था देखील प्रगतीची शिखरे पादाक्रांत करीत असून या संस्थेने चालू आर्थिक वर्षात ७३ लाख ५९ हजार रुपये नफा मिळविला आहे. बँकेकडे ३४ कोटीच्या ठेवी असून २३ कोटी ३२ लाखाचे कर्ज वाटप केले आहे. गुंतवणूक २२ कोटी ३९ लाख आहे. अशा प्रकारे ना. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली  कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कारखान्याच्या सलग्न असणाऱ्या सर्व सहकारी संस्था वेगाने प्रगतीच्या दिशेने गगनभरारी घेत  असल्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page