कर्मवीर भाऊराव पाटील यांना दिलेला शब्द स्वर्गीय काळे यांनी शेवटपर्यंत पाळला : अजित पवार
Late Kale kept his word to Karmaveer Bhaurao Patil till the end: Ajit Pawar
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Wed 6 Mar 2022,19 :20Pm.
कोपरगाव : कर्मवीर भाऊराव पाटील आण्णा यांच्या विचाराचा वारसा हा स्वर्गीय काळे यांनी सातत्याने जपला, नुसता जपलाच नाही तर पुढे नेला. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नंतर सर्वाधिक काळ रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या कार्यकाळात रयतेचा वेगाने विस्तार झाला राज्यात सर्वदूर रयतच्या शाखा त्यांनी सुरू केल्या. काळे साहेबांनी अण्णांना शब्द दिला होता की स्वतःच्या शैक्षणिक संस्थांच्या खाजगी शाखा काढणार नाही हा शब्द दिला होता व तो स्वर्गीय काळे यांनी शेवटपर्यंत पाळला असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंकरराव काळे यांच्या १०१ वी जयंतीच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
बुधवारी (६) एप्रिल रोजी कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व नुतन पोलिस स्टेशन इमारत,बस स्थानक,पंचायत समिती कार्यालय लोकार्पण उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते तसेच गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते. प्रास्ताविक श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले. यावेळी त्यांनी मतदारसंघातील विविध प्रश्न मांडले व अनेक मागण्या केल्या.
अजित पवार म्हणाले, आज स्वर्गीय काळे साहेबांची १०१ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांचा पूर्णाकृती पुतळा हा सर्वासाठी व समस्त कोपरगावकरांसाठी आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे. कर्मवीर काळे हे कोपरगाव नगर जिल्हा व राज्याच्या विकासाला वाहून घेतलेलं नेतृत्व होतं. नगर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष ते होते १९६२ ते १९७२ असे सलग दहा वर्षे त्यांनी जिल्हा प्रदेश परिषदेचे नेतृत्व केले उद्या कधी नगर जिल्ह्याचा इतिहास दिला जाईल त्यामध्ये मग स्वर्गीय शंकरराव काळे, स्वर्गीय शंकरराव कोल्हे, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले, बाळासाहेब विखे,बाबुराव दादा तनपुरे,आबासाहेब निंबाळकर किंवा आपल्याला मार्गदर्शन करणारे यशवंतराव गडाख असतील या सगळ्या मान्यवरांनी या जिल्ह्याला आणि आपापल्या परिसराला पुढे नेण्याचे आपापल्या परीने प्रयत्न केला, ही सर्व ताकदीची माणसं या सर्व नेते मंडळींनी सहकारी साखर कारखानदारीच्या जोरावर येथे आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था काढल्या साखर कारखानदारीत बायप्रॉडक्ट काढले, कारखानदारी कशी चालवायची हे उभ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला दाखवून दिलं. यातूनच आज आपण या माणसांचा अतिशय आदरपुर्वक, सन्मानपूर्वक उल्लेख या ठिकाणी करतो. नगर जिल्हा राजकीय सामाजिक शैक्षणिक व सहकार चळवळीच्या दृष्टीने आमच्या महाराष्ट्र राज्यातला एक महत्वाचा जिल्हा या जिल्ह्याने अनेक मोठे नेते राज्याला दिले, देशाला दिले, या नेत्यांमध्ये स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे यांचं अग्रक्रमाने नाव तुम्हाला आम्हाला घ्यावाच लागेल असेही ते म्हणाले,
मी शब्दाचा पक्का आहे. महाराष्ट्राला पण माहित आहे ज्यावेळेस आम्ही शब्द देतो.तो शब्द कधी फिरवत नाही. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राजकीय, सामाजिक चळवळीत नगर जिल्ह्याच योगदान आहे. १९९१ साली लोकसभा निवडणुकीत शंकरराव काळे खासदार झाले, तेव्हा मी ही खासदार झालो. मला ६ महिने कालावधी मिळाला. पी. व्ही. नरसिंहराव यांनी मला सांगितले की अवसिश्वास ठरवानंतर तू राजिनामा द्यायचा, शरद पवार तुझ्या जागी खासदार होतील हा किस्सा देखील अजित पवार यांनी सांगितला.
आम्ही कितीही राज्यभर गप्पा मारत असलो तरी आमचे मतदारसंघ सोडून जात नाही. मात्र, शंकरराव काळे आपला मतदार संघ सोडून दुसऱ्या ठिकाणीहून दोनदा निवडून आले असेही ते म्हणाले.
अडीच वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी तरुणांना संधी दिली त्यात चुरशीच्या निवडणुकीत तुम्ही आशुतोष काळे यांना विधिमंडळ मध्ये पाठवले, याबाबत तुमचे आभार मानतो असेही अजित पवार म्हणाले. दोन वर्षे कडक निर्बंध होते, त्यामुळे कार्यक्रम घेतले नाहीत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात लादलेले बंधन, नियम बाजुला केले, मास्क ऐच्छिक आहेत. बंधनकारक नाही, मात्र आमचे टास्क फोर्स लक्ष ठेवून आहे आम्ही तिथे कुठेही कमी पडणार नाही ती आमची नाही ती एक जबाबदारी आहे त्या करता जी खबरदारी घ्यायची ती आम्ही घेऊच, टास्क फोर्सशी चर्चा करू काय जगात चाललं, काय देशात चाललं, काय राज्यात चाललंय याही बद्दल आम्ही जागृक आहोतच पण दोन वर्षाच्या गावांमध्ये सगळ्यांची अडचणीची गेली.असेही पवार म्हणाले.
कोरोना काळात अर्थव्यवस्थेला फटका बसला रोजीरोटी, हातावरची पोटं असणाऱ्यांचे धंदे बंद पडले,अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आता पुन्हा ते सर्व मूळ पदावर आणायचं त्याकरता कालच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही खूप महत्वाचे निर्णय घेतले. कुठलाही टॅक्स लावला नाही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात ते पुन्हा पूर्ववत आणायचे आहे. अर्थसंकल्पात कुठलाही नवा टॅक्स लावला नाही. रस्ते,विकास कामासाठी निधी राखीव ठेवला आहे. पाण्यावर सर्वांचा अधिकार आहे, आधी पिण्यास नंतर शेतीस व नंतर उद्योग धंद्यास पाणी असा पाणी वापराचा क्रम जाहीर केला आहे.सर्व विकासकामे करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. मी शब्दाचा पक्का आहे, शब्द कधी फिरवत नाही असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, कामे केली तर लोक आपल्या बरोबर आहात आता राजकारण बदलल आहे अचानक काही लोक भोंगे बंद करायचे भाषा करायला लागली आहेत अरे इतके दिवस काय झोपा काढल्या होत्या ? या बोलणार यापैकी कोणीच मागच्या सरकारमध्ये नव्हते का असा सवाल करताना अशाच वेगळ्या गोष्टी पुढे आणायचे आणि विकासाला महत्त्व द्यायचे ऐवजी वेगळी चर्चा घडवून आणायची समाजात वितुष्ट कसे निर्माण होईल दरी कशी निर्माण होईल यासाठी यांचा प्रयत्न चालला आहे हा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र असल्याचे त्यांना विसर पडला असल्याचा टोला राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी लगावला.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुजय विखे , आमदार आशुतोष काळे आमदार चिकटगावकर,आमदार किशोर दराडे, आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी आमदार दादा कळमकर, भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, सिताराम गायकर, अशोक भांगरे, राजश्री घुले, अनुराधा आदिक, दुर्गाताई तांबे, मीनाताई जगधने, डॉ. एकनाथ गोंदकर, अविनाश दंडवते, सुहास आहेर, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके अविनाश आदिक, राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, कपिल पवार, कारभारी आगवण,नारायणराव मांजरे, सुधाकर रोहोम, राजेंद्र झावरे, तुषार पोटे, चैताली काळे, पुष्पाताई काळे, अनिल शिंदे यासह जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, आजी-नगरसेवक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोना काळातही महाविकास आघाडी सरकारने नगर जिल्ह्यावर अन्याय होऊ दिला नाही. दरवर्षी टप्प्याटप्प्याने १३७० कोटी रुपये निधी दिला. मुख्यमंत्री सडक योजना मान्यता मिळाली आहे. शिवराज्याभिषेकदिन यापुढे शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार आहे, स्मार्ट गाव योजना ऐवजी आर आर आबा पाटील योजना, कोरोना मध्ये मृत्यू पावलेले यांना ५० लाखाचे कवच देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. महाआवास योजनेतून आतापर्यंत दहा हजार घरांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी माहिती त्यांनी दिली. आ. आशुतोष काळे यांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहील अशी ग्वाही दिली.
यावेळी गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील म्हणाले, कोपरगावातील काम बघितल्यानंतर मतदार संघाच्या विकासाची कला आशुतोष काळे यांना अवगत झाली आहे. शेतकरी व नागरिक यांना कायमस्वरूपी त्यांच्या पायावर उभे करायचे असेल तर लांब पल्ल्याचे नियोजन करावे लागेल असा सल्लाही त्यांनी आशुतोष काळे यांना दिला. स्वर्गीय शंकरराव काळे यांच्या कार्याचा गौरव केला. शेवटी आभार लताताई शिंदे यांनी मानले.
चौकट
ग्रामीण पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस वसाहत बाबत मी आज काही बोलत नाही कारण अर्थमंत्री असताना यावर गृहमंत्री यांनी भाष्य करू नये ते उचित होणार नाही याचे उत्तर जे काय आहे ते दादा देतील, आणि माझी खात्री आहे मी जे बोललो ते लगेच समजून घेतात माझं पण नेहमी ऐकतात त्यामुळे मी आधीक काही बोलत नाही.
चौकट
एसटीचा संप ताणला गेला आहे आम्ही मध्यस्थी केली आहे. कोर्टाने ही निर्णय दिलेला आहे. परंतु काही लोक हे होवू नये यासाठी प्रयत्न करतात राजकारणात सुरूच असतं आमची एवढीच इच्छा आहे की, एसटीच्या संपाचं गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणे होऊ नये काल-परवापर्यंत एक संधी दिली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून चर्चा करू – अजित पवार
चौकट
आम्ही सात सात वेळा लाख लाख मतांनी विजयी होतो. पण तुम्ही कसं बसं आम्हाला निवडून आणलं ८०० मत माझे माझ्या प्रत्येक करीत आठ ते दहा हजार मते घेतो आम्ही साधू संत नाही, माणस आहोत आमच्या विचाराचा तरुण निवडून दिला म्हणून हे सर्व देतो पण पुढच्या वेळेस मताधिक्य वाढलं पाहिजे ही हात जोडून विनंती करतो. घोडा मैदान कुठे लांब आहे बघू ना जिल्हा परिषद पंचायत समितीला काय दिवे लावता पालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आधी आहेत तेंव्हा तुम्ही काय करता मी तर सांगितलेली कामे नाही केली तर पवारांची अवलाद सांगायचो नाही असेही अजित पवार म्हणाले.
चौकट
कोपरगाव शहरात आल्यानंतर सकाळपासून गाडीमध्ये अजित दादा बरोबर होतो असतोच गाडी चालवायला होता गाडी चालवता चालवता दादांना दादा हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे आणि दादास सारखं हेच तुला देऊन टाकतो असे म्हणत होते काय एवढा लाड ? हे मला माहीत नाही. असा किस्सा ना. दिलीप वळसे यांनी सांगितल्यावर मोठा हशा पिकला…