आता नेपाळच्या डॉक्टरांना भारताचे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. आव्हाड आयुर्वेदिक धडे देणार

आता नेपाळच्या डॉक्टरांना भारताचे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. आव्हाड आयुर्वेदिक धडे देणार

Now the doctors of Nepal are being treated by the National Ayurveda Guru of India, Dr. Awhad will give Ayurvedic lessons

Rajendara Salkar| वृत्तवेध ऑनलाईन! Thu14 Apr 2022,10 :00Am.

कोपरगाव : नेपाळ गव्हर्नमेंट च्या नॅशनल आयुर्वेद रिसर्च व ट्रेनिंग सेन्टर काठमांडू या आरोग्य विभागातर्फे त्यांच्या डॉक्टरांना पंचकर्म ट्रेनिंग देण्यासाठी कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड यांना व त्यांचे सहकारी श्रीरामपूर येथील आयुर्वेद तज्ञ सतीश भट्टड यांना निमंत्रित केले आहे.

नेपाळ येथे १८ ते २० एप्रिल या नऊ दिवसांच्या कालावधीत चालणारी हि कार्यशाळा असून या कार्यशाळेत उपस्थित डॉक्टरांना सलग तीन दिवस डॉ रामदास आव्हाड व डॉ सतीश भट्टड व्याख्यान व प्रत्यक्ष कर्माद्वारे करणार आहेत.

भारतीय स्वदेशी आयुर्वेदाचा प्रसार परदेशात करण्यासाठी हे आयुर्वेद डॉक्टर काठमांडूस रवाना होत आहेत. कुठल्याही aplication शिवाय नेपाळ सरकारच्या हेल्थ विभागाकडून गेल्या सहा महिन्यापासून डॉ. रामदास आव्हाड यांना विनंती करण्यात येत होती .ग्रामीण भागात राहून परदेशात अशाप्रकारे निमंत्रित केले जाणे हि नक्कीच गौरवास्पद व अभिमानास्पद गोष्ट असल्याचे डॉ. आव्हाड व डॉ. भट्टड यांनी सांगितले.

प्रत्यक्ष कर्म करण्यासाठी डॉ.रामदास आव्हाड यांना त्यांची कन्या डॉ. रिद्धी आव्हाड त्यांना मदत करणार आहेत.

नुकतीच राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाने डॉ रामदास आव्हाड यांची सलग आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून नियुक्ती केली आहे. भारतातील सर्व राज्यातील आयुर्वेद पदवीधर डॉक्टरांना पंचकर्म शिकविण्याचे काम डॉ. आव्हाड सातत्याने करत आहेत. आता भारताबाहेर जाऊन परदेशातील डॉक्टरांना आयुर्वेद शिकविण्याचे कामही ते काठमांडूस जाऊन करणार आहेत.त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page