संजीवनी एसएपीच्या विद्यार्थ्यांची ८ लाखाच्या पॅकेजवर क्रीप्ट इंडिया कंपनीमध्ये निवड – अमित कोल्हे
Sanjeevani SAP students selected in Crypt India Company on Rs 8 lakh package – Amit Kolhe
Rajendara Salkar| वृत्तवेध ऑनलाईन! Wed 13 Apr 2022,
18 :00Pm.
कोपरगांव: संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सॅप प्रशिक्षणाच्या माध्यमातुन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधिल अंतिम वर्षातील तीन विध्यार्थ्यांना क्रीप्ट इंडिया प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मुलाखती घेवुन वार्षिक पॅकेज रू ८ लाखावर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए, इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, सिनिअर काॅलेज मधिल विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवुन देवुन पालक व विध्यार्थ्यांची नोकरदार होण्याची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी संजीवनीच्या माध्यमातुन अनेक प्रयत्न करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणुन संजीवनीने एसएपी या प्रशिक्षण देणाऱ्या जागतिक पातळीवरील कंपनीशी सामंजस्य करार केला केला आहे. या कंपनीचे एक केंद्र संजीवनी मध्ये असुन या केंद्राद्वारे विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देवुन सक्षम केल्या जाते. अलिकडेच या केंद्रातुन प्रशिक्षण घेतलेल्या संजीवनीच्या पायल गोटू पटेल, अक्षय वासुदेव शिरसाठ व रेणुका दत्तात्रय काळे या ०३ विध्यार्थ्यांना क्रीप्ट इंडिया प्रा. लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने तब्बल आठ लाखांचे वार्षिक पॅकेज देवु करून नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. क्रीप्ट इंडिया प्रा. लिमिटेड ही ग्लोबल ट्रेंड्स सप्लाय चैन सोल्युशनसाठी आघाडीची कंपनी असुन ३५ देशात या कंपनीचे कार्य चालते. या कंपनीत निवड झालेले तीनही विध्यार्थी हे ग्रामिण भागातील असुन तीनही विध्यार्थ्यांच्या पालकांनी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालया प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.
विध्यार्थ्यांच्या या निवडी बाबत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी गुणवंत विध्यार्थ्यांसह त्यांच्या भाग्यवान पालकांचे तसेच काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, सॅप समन्वयक डाॅ. ए. बी. पवार व विभाग प्रमुख डाॅ. माधुरी जावळे यांचे अभिनंदन केले आहे.