कोपरगावात व्यापारी महासंघाच्या सी. सी.टी.व्ही. कॅमे-यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात – संजय सातव
Kopargaon Chamber of Commerce c. C. TV Cam – Due to crime control – Sanjay Satav
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu14 Apr 2022,18 :00Pm.
कोपरगाव : कोपरगाव शहरात व्यापारी महासंघाने सी. सी. टी.व्ही. कॅमेरे बसविल्याचा फायदा व्यापारी व पोलिसांना झाल्याने कोपरगाव शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आली असल्याचे गौरवउद्गार शिर्डी उपविभागीय पोलिस अधीक्षक संजय सातव यांनी व्यापारी महासंघाच्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
नव्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांनी शिर्डी उपविभागीय पोलिस अधीक्षक संजय सातव यांचा तर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचा सत्कार कार्याध्यक्ष सुधीर डागा, यांनी केला.
यावेळी काका कोयटे म्हणाले, आम्ही शहरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आणखी काही कॅमेरे देण्यासाठी तयार तयार आहोत मात्र या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलीस नियंत्रण कक्षाने स्वतःकडे ठेवावे. अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे, सुधीर डागा, तुलसीदास खुबानी,गुलशन होडे,नारायण अग्रवाल व पदाधिकारी उपस्थित होते.





