महाराष्ट्राचे इलेक्ट्रिक वाहन धोरण देशात एक नंबर – मंत्री सुभाष देसाई
Maharashtra’s electric vehicle policy number one in the country – Minister Subhash Desai
विकास हवा पण, निसर्ग भकास न होता.हे सोमैय्या ग्रुपने जपले आहे Development is needed, but nature is not bhakas. This is cherished by Somaiya Group
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 16 Apr 2022, 15 :30Pm.
कोपरगाव: महाराष्ट्रात शाश्वत आणि प्रदूषणरहीत वाहनांचा अंगीकार करणे, इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरात महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर बनविणे, भारतात वाहन उत्पादनातील महाराष्ट्राचे आघाडीचे स्थान कायम राखणे आणि इलेक्ट्रिक वाहन आणि त्यासंबंधित घटक याकरिता जागतिक पातळीवर एक प्रमुख उत्पादक आणि गुंतवणुक केंद्रस्थान म्हणून उदयास येणे हे या धोरणाचे लक्ष्य आहे, वापरकर्ते आणि कंपन्यांना विविध प्रोत्साहने देणाऱ्या राज्याचे महत्त्वाकांक्षी असे इलेक्ट्रीक वाहन धोरण देशात एक नंबर असल्याचे गौरव उद्गार राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी साकरवाडी येथे एका कार्यक्रमात केले. यामुळे महाराष्ट्र हा विज वाहन उद्योगाचे केंद्र होईल. त्यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे असेही ते म्हणाले,
कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथील चेतना मंगल कार्यालय येथे शुक्रवारी (१५) रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित सोमैय्या ग्रुपच्या “स्पेशालिटी केमिकल प्लांट’ भूमिपूजन व “रिसर्च लॅबोरेटरी’ शुभारंभ सोहळ्यात मंत्री सुभाष देसाई बोलत होते.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, ना. आशुतोष काळे, गोदावरी बायोरिफायनरीज लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक समीरभाई सोमैय्या, सौ.अमृताबेन सोमैय्या, गोदावरी बायोरिफायनरीज लि. चे कार्यकारी संचालक डॉ. संगीता श्रीवास्तव निमंत्रक गोदावरी बायोरिफायनरीज लि. चे संचालक सुहास गोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना.सुभाष देसाई म्हणाले, सोमय्या ठाकरे संबंध तीन पिढ्या पासूनचे आहेत. प्रबोधनकार ठाकरेंच्या जीवनगाथा पुस्तकाचे प्रकाशन करमशी भाई सोमैय्या यांनी केले होते. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होत. विकास होताना निसर्ग भकास होता कामा नये. अशी इच्छा व्यक्त करतात. ही जबाबदारी उद्योगाचा उद्योजकांच्या आहे सोमैय्या ग्रुपने उद्योग वाढविताना निसर्गाची पुरेपूर काळजी घेतली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा प्रकल्प हवा, पण वृक्षाची कत्तल नको, निसर्गाला धक्का लागता कामा नये. अशी इच्छा व्यक्त करतात. Covid-19 धुमाकूळ घालत असताना ही महाराष्ट्र थांबला नाही.महाराष्ट्रात उद्योगासाठी 98 कंपन्यांशी करार केलेला आहे.त्यातुन तीन लाख कोटीची गुंतवणूक पक्की केली आहे. दर्जेदार शिक्षणामुळे सोमैय्याच्या शिक्षण संस्था नामांकित आहेत. सोमैय्या ग्रुपने सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानासह उद्योग, शिक्षण,व संशोधन या तीनही क्षेत्रात ठसा उमटविला असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
प्रारंभी प्रास्ताविक करतांना समीरभाई सोमैया म्हणाले,साकरवाडी हे आमच्या आजोबांचे प्राण आहे, त्यांनी येथून सुरुवात केली, माझे वडील म्हणायचे की भविष्यात आम्हाला आमच्या पायावर उभे राहायचे आहे, म्हणून संशोधनाचे असे इंजिन बनवा, ज्याच्या आधारे आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेला कधीही घाबरणार नाही. कालचक्र सतत फिरत राहते, मग आम्हाला आमच्या ज्ञानाचा शोध लावायचा आहे, ना परवाना, ना कुणाची कॉपी, यासाठी इथे प्रयोगशाळा बांधली, आम्ही आमच्या संशोधनाने इथे नव्या रोपट्याचा पाया घातला, ते पुनर्रचनेचे प्रतीक आहे, आम्ही पुढे जाऊ साकरवाडी आमच्या आजोबांची सुरुवात आहे, आम्ही तेथूनच पुढे जाऊ, संशोधन म्हणजे एका दिवसाचा शोध नाही, हे सांगताना त्यांनी कबीर की पंक्तियॉं
धीरे धीरे रे मना, धीरे सबकुछ होये!
माली सिचे सौ घडा, ऋतु आये पल मे होये !
म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी ना. आशुतोष काळे म्हणाले, सोमैय्या समूहाने वारिस तालुक्यातील परिसराला रोजगाराच्या माध्यमातून जीवदान दिले आहे महात्मा गांधींची प्रेरणा असलेल्या के. जे. सोमैय्या यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात इथेनॉलची निर्मिती करून ग्रामीण भागाला आर्थिक ऊर्जा दिली असे गौरवोद्गार व्यक्त केले. तर यावेळी मंत्री सुभाष देसाई यांना कोपरगाव हे नगर, नाशिक, औरंगाबाद व धुळे या चारही जिल्ह्यांच्या मध्यवर्ती असून याठिकाणी रेल्वे स्टेशन, विमानतळ आहे. सर्व काही अनुकूल आहे. तेंव्हा कोपरगावकडे आपले लक्ष असू द्या, आपले सहकार्य असू द्या, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना खा. सदाशिव लोखंडे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात सोमैय्या यांनी खाजगी साखर कारखाना सुरु केला. परंतु सहकार चळवळीनंतर तो बंद पडला आज पुन्हा सहकारी साखर कारखाने बंद पडून खाजगी कारखाने सुरू होत आहे तेंव्हा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून तुम्ही पुन्हा एकदा ५० हजार टन क्षमतेचा खाजगी साखर कारखाना सुरु करा, असे समीर सोमैय्या यांना आवाहन केले. तर कोपरगाव तालुक्यात दुष्काळी भाग असून वीस हजार एकर जमीन आहे. तेंव्हा फाइव स्टार एमआयडीसी काढा दोन लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशी जाहीर मागणी मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली.
या शानदार सोहळ्यात चे सूत्रसंचालन मैथाली आठवले यांनी केले, तर शेवटी आभार गोदावरी बायोरिफायनरीजचे संचालक सुहास गोडगे यांनी मानले.
गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, नितीन औताडे, वारीगाव सरपंच सतीष कानडे, माजी सभापती मच्छिंद्र टेके,नायब तहसीलदार सौ.मनिषा कुलकर्णी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,यासह पंचक्रोशीतील मान्यवर, ग्रामस्थ व नागरीक हजर होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोदावरी बायोरिफायनरीज लि. चे डेप्युटी मॅनेजर बाळासाहेब पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली असिस्टंट मॅनेजर संजय कराळे जूनियर ऑफिसर गणेश पाटील व कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
चौकट
मंत्री आले की त्या त्या भागातील खासदार आमदार त्यांच्याकडे काही ना काही मागत असतात व आपली भूमिका बजावत असतात त्याचप्रमाणे खासदार लोखंडे आमदार काळे यांनी आपली भूमिका बजावली आहे. कोपरगाव तालुक्याच्या उद्योग वाढीसाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन मुंबईला बैठक घेऊ, नवे पाऊल कसे पडते ते पाहू असे आश्वासन दिले.
चौकट
दिल्लीत येणाऱ्या परदेशी उद्योगाकडे लक्ष ठेवा, त्याची आम्हाला माहिती द्या, म्हणजे त्यातील काही उद्योग महाराष्ट्रामध्ये आणत येतील याची आठवण मंत्री सुभाष देसाई यांनी खासदार लोखंडे यांना करून दिली.
Post Views:
331