साई तपोभुमी चौक स्टेशन रोडला म्हसोबा महाराज यात्रोत्सव
Mhasoba Maharaj Yatra on Sai Tapobhumi Chowk Station Road
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sun 17 Apr 2022,
16 :00Pm.
कोपरगाव : साई तपोभुमी चौकातील स्टेशन रोडला श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सव उत्साहात पार पडला. कोपरगाव तालुका येथे रिक्षा स्टेशन रोड येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करून मांडव टाकण्यात आला होता.
यात्रोत्सवानिमित्त रविवारी (१७) रोजी सकाळी यात्रेनिमित्त सत्यनारायण पूजा व होमहवन आरती करण्यात आली . सकाळपासून भाविक व महिलांना लापशी, मसाले भात व मठ्ठा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे रिक्षाचालकांनी साठ किलो रव्याची लापशी, साठ किलो मसाले भात व १०० लिटर थंडगार मठ्ठा केला होता. महाप्रसादाचे वाटपाची सुरवात रिक्षा संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, उपाध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र सालकर यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, रिक्षा संघटनेचे संचालक गोकुळ हंडोरे, माजी नगरसेवक विवेक सोनवणे, महेश खडामकर, सुनील तांबट, अनिल वाघ , पापाभाई तांबोळी आदिं मान्यवरांसह परिसरातील भाविक व महिलांनी तसेच रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष अशोक नाईकवडे, उपाध्यक्ष गोरख महाजन, खजिनदार एकनाथ जगताप, सहखजिनदार पंकज घोलप, संजय भुजोड, बापू देवरे, अर्जुन कापसे, गणेश कुंढारे, काकासाहेब पवार, रवींद्र वाघ विलास कु-हे व सर्व सभासद यांनी परिश्रम घेतले.