कोपरगावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांना अभिवादन
Greetings to Dr. Babasaheb Ambedkar and Lord Mahavir in Kopargaon
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu14 Apr 2022,19 :30Pm.
कोपरगाव : शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’ असा संदेश देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण विश्वाला सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. त्यांचे बहुमोल विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या वैज्ञानिक विचारांची आज देशाला गरज आहे.असे प्रतिपादन श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.
ना. आशुतोष काळे म्हणाले दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आणि जगु द्या असा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांनी जगाला सत्य, अहिंसेची, प्रेमाची शिकवण दिली. त्यांच्या विचारांना स्वत:च्या आचरणात आणून त्याचे पालन करणे हे खऱ्या अर्थाने भगवान महावीरांना अभिवादन ठरेल.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार संबोधले जाते. त्यांचे विचार सर्व समाजाला उदबोधक आहे. युवकांनी त्यांच्या विचारांचे समग्र अध्ययन करून त्याचा दैनंदिन व्यवहारात वापर करावा असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
विवेक कोल्हे म्हणाले, भगवान महावीरांनी अहिंसेची शिकवण देत मानव जातीच्या कल्याणासाठी केलेले कार्य प्रेरणा देणारे आहे.
हिंदुहृद्यसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पोहेगाव मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती १४ एप्रिल २०२२ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त श्री.गो. विदयालयात अभिवादन करण्यात आले यावेळी दिलीप अजमेरे चंद्रकांत ठोळे, कैलास ठोळे, सचिन अजमेरे,डॉ.अमोल अजमेरे, संदीप अजमेरे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर हजर होते.