येसगाव चे मेघना दरेकर यांचा स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार
Meghna Darekar of Yesgaon felicitated by Snehalta Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 26 Apr 2022,18 :30Pm.
कोपरगाव : येसगावची लेक कुमारी मेघना दरेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्तिगत भेट घेऊन सत्कार केला. माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने मेघना यांच्या यशाने पूर्ण झाले असे सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.
सौ स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या माझ्या सामाजिक विकासाच्या कार्याचा व महिलांच्या संघटनाचा कुमारी मेघना यांना सतत आदर्श वाटत असल्याचे त्यांनी म्हणताच मला मनस्वी समाधान वाटले कारण एक अधिकारी म्हणून जडणघडण होणारी उच्चशिक्षित तरुणी माझ्या कार्याचा उल्लेख अशा मौलिक क्षणी करत आहे हे माझ्यासाठी नक्कीच स्मरणनिय आहे.
आजवर मला मिळालेले सर्व पुरस्कार व पारितोषिक ही आपल्या हातून मिळाली आहेत जे माझ्यासाठी खूप भूषणावह आहे अशी आठवणही या निमित्ताने मेघना यांनी आवर्जून सांगितली..
येसगाव पंचक्रोशीतून पहिली क्लास वन महिला अधिकारी मेघना ठरल्या आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेतून उपविभागीय जलसंधारण अधिकारी (वर्ग १) म्हणून मेघना यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या कुटूंबीयांचे सौ स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले. या प्रसंगी मेघना यांचे वडील श्री.कैलास दरेकर,आई सौ.जयश्री दरेकर व कुटूंबीय उपस्थित होते.