कोपरगाव : सुरत (गुजरात) येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुवर्णपदक मिळविले यात के. जे. सोमैयाच्या साक्षी गाडे हिने महत्त्वाची भूमिकाबजावली असल्याची माहिती कॉलेज कडून देण्यात आली आहे. साक्षी गाडे हिची चेन्नई येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे अशी निवड होणारी साक्षी गाडे ही जिल्ह्यातली पहिली मुलगी ठरली आहे.
कु. साक्षी गाडेला यशाबद्दल अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव मा अॅड. संजीव कुलकर्णी, सदस्य संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी एस यादव, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे आदींनी तिचा सत्कार करून तिला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. साक्षी गाडे हिला डॉ.सुनील कुटे यांचे मार्गदर्शन लाभले.