कोपरगावचे गेलेले वैभव पुन्हा मिळवायचे आहे-ना. आशुतोष काळे
We want to regain the lost glory of Kopargaon. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 28 Apr 2022,14 :20Pm.
कोपरगाव: सर्वांच्या सहकार्यातून विविध विकासकामे पूर्ण करून कोपरगावचे गेलेले वैभव पुन्हा मिळवायचे असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी महात्मा गांधी प्रदर्शन येथील लायन्स क्लबच्या सांस्कृतिक महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी केले.
ना.काळे पुढे म्हणाले की, मागील दोन वर्षात कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी १३१ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे. निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे. वर्षभरात पाणी प्रश्न सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण होत आली असून अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. कोपरगाव शहराच्या विकासासाठी १८ कोटी निधी कोपरगाव नगरपरिषदेला दिला आहे. कोपरगाव शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या आय.टी. आय, इमारतीचे सात कोटीचे काम पूर्ण होवून येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी नवीन इमारतीतच प्रशिक्षण घेवू शकणार आहे. अशी विविध कामे मागील दोन वर्षात पूर्ण केली आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, काका कोयटे, राजेश मालपाणी, किशोर निर्मळ, विलास शिंदे, बाळासाहेब कापसे, लायन्स, लिओ, लायनेसचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.