शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दुग्ध व्यवसाय वाढविणार – मिनेश शहा

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दुग्ध व्यवसाय वाढविणार – मिनेश शहा

Dairy business to be expanded to prevent farmer suicides – Minesh Shah

बाईक माऊंटेबल मिल्कींग मशिन वाटपBike Mountable Milking Machine Allocation

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 28 Apr 2022,14 :00Pm.

कोपरगांव :ज्या भागात दुग्ध व्यवसायाचे प्रमाण कमी आहे अशा भागात आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधनाअंती निदर्शनास आलेले आहे. अशा भागात जाऊन तिथल्या शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी काही महत्वपूर्ण आणि लक्षवेधी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे चेअरमन मिनेश शहा यांनी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड, आनंद, गुजरातच्या बाईक माऊंटेबल मिल्कींग मशिनचा वितरणप्रसंगी केले.

भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनचे चेअरमन मंगलजीत राय, हरिभाऊ बागडे, शामलभाई पटेल, के. सी. सुपेकर, व्यंकटराव नाडगौडा, सत्यव्रत बोस, श्रीनिवास सज्जा, अनिल हातेकर, डी. के. पवार, राजेंद्रबापू जाधव आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी नामदेवराव परजणे पाटील प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले.

मिनेश शहा पुढे म्हणाले,सहकार मंत्री अमित शहा यांच्या यांनी सहकार मार्गदर्शक प्रणाली अवलंब राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दुग्ध व्यवसाय आणि तत्सम उद्योगाच्या विकासासाठी योजना आणि कार्यक्रम तयार करण्याचा आमचा सतत प्रयत्न राहिलेला आहे. देशात वाढलेला दुग्धव्यवसाय ही श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरीयन यांचीच देणगी आहे. दुग्ध व्यवसायात प्रचलित पध्दत न वापरता आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधीक अवलंब होणे गरजेचे आहे. चुकीचे व अनियंत्रीत संकरीकरण होत असल्याने संकरीत गाईंची दूध देण्याची क्षमता कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर दुग्ध व्यवसाय अधिक किफायतशीर कसा होईल याकडे व्यवसायिकांनी गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही श्री शहा यांनी सांगितले.

हरिभाऊ बागडे यांनी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या स्मृतींना उजाळा दिला. नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात गोदावरी दूध संघाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना रोजगारची संधी उपलब्ध झालेली असल्याचे सांगितले. दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता हा व्यवसाय प्राणिकपणे आणि निष्ठेने केला तर यश हमखास मिळतेच असा सल्लाही श्री बागडे यांनी दिला.

याप्रसंगी मंगलजीत राय, के. सी. सुपेकर, डी. के. पवार यांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमास गोदावरी दूध संघाचे उपाध्यक्ष संजय खांडेकर, संचालक उत्तमराव माने, भाऊसाहेब कदम, यशवंतराव गव्हाणे, कारभारी थोरात, सदाशिव कार्ले, दिलीप तिरमखे, कार्यकरी संचालक चंद्रकांत गाढवे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचार उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page