चांदे विकास सोसायटी काळे गटाचे अध्यक्ष होन तर उपाध्यक्ष चव्हाण
Chande Vikas Society will be the president of Hon the Kale group while Chavan will be the vice president
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 28 Apr 2022, 14 :30Pm.
कोपरगाव: तालुक्यातील चांदेकसारे येथील चांदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी काळे गटाचे दगु सखाराम होन तर उपाध्यक्षपदी शंकरराव गहिनाजी चव्हाण यांची ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे.
निवड प्रक्रियेचे कामकाज सुनील क्षिरसागर यांनी पाहिले तर त्यांना संस्थेचे सचिव गोरक्षनाथ फटांगरे यांनी मदत केली. यावेळी दुर्गा भिकाजी होन,सचिन होन,कर्णा चव्हाण, शरद होन, किरण होन मधुकर होन, रवी होन, मोहन गुजर, रविंद्र खरात,संजय होन, सतिश खरात,शांतीलाल होन,सुरेश चव्हाण, विलास चव्हाण, युनुस शेख आदी उपस्थित होते.
सोसायटीच्या संचालक मंडळात पाराजी आप्पासाहेब होन,पुंजाची साहेबराव होन, नामदेव बारकु होन, संदिप भगिरथ होन,शंकरराव गहिनाजी चव्हाण, दगु सखाराम होन,खरात मधुकर कारभारी, चंद्रकांत सुभाष होन, बाळासाहेब तुळशीराम खंडीझोड, गिताबाई धनंजय चव्हाण, जानकाबाई रावसाहेब होन,बापुराव दगुराव जावळे, राघुजी साळुजी कोळपे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा संस्थेच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.
संस्थेची निवडणूक बिनविरोध होणे कामी विलास चव्हाण व सचिव गोरक्षनाथ फटागंरे यांनी विशेष प्रयत्न केले.सूत्रसंचालन गोरक्षनाथ फटांगरे यांनी केले तर विलास चव्हाण यांनी मानले.