महाराष्ट्राची एकता,अखंडता टिकवून ठेवणे आपले सर्वांचे कर्तव्य – ना.आशुतोष काळे
It is the duty of all of us to maintain the unity and integrity of Maharashtra – Na. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on :Mon 2 May2022,18.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : देशाच्या विकासात्मक जडणघडणीत सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक योगदान असलेल्या महाराष्ट्राची ओळख प्रगतीशील व एकात्मिक विचारांचे राज्य अशी आहे. एकता,अखंडता टिकवून ठेवणे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याच्या भावना श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी (१मे) महाराष्ट्रदिनी कोपरगाव तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण प्रसंगी व्यक्त केल्या.
ना. आशुतोष काळे म्हणाले, महाराष्ट्र ही संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ अशा अनेक संतांच्या आचारांनी, विचारांनी पावन झालेली भूमी आहे. याच महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा लिहिली गेली. अनेक महात्मे, स्वातंत्र्यसैनिकांना इथल्या भूमीने जन्म दिला. अशा या महान महाराष्ट्राला १ मे १९६० रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांना अभिवादन करून कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप, पं.स. शाखा अभियंता उत्तमराव पवार, कृषी अधिकारी पंडित वाघिरे, कारागृह अधीक्षक चंद्रकांत कुलथे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहिफळे नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते