जनआक्रोश आंदोलन हा राजकीय अस्तित्वाचा देखावा -कारभारी आगवण

जनआक्रोश आंदोलन हा राजकीय अस्तित्वाचा देखावा -कारभारी आगवण

Janaakrosh Andolan is a show of political existence- Agawan

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Mon 2 May2022,19.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव: कोल्हेंचे शेतकऱ्यांविषयी प्रेम राज्यव्यापी शेतकरी संप मोडला त्यावेळी संपूर्ण राज्याने पाहिले आहे. मागील अडीच वर्षात ना.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. जनतेला विकास दिसत आहे. त्यामुळे जनता समाधानी आहे. मात्र अस्तित्वाची विरोधकांना भीती वाटत असल्यामुळे जनआक्रोश आंदोलन हा राजकीय अस्तित्वाचा देखावा असल्याची टीका कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन यांनी केली आहे.

कारभारी आगवन पुढे असे म्हटले आहे की, एकीकडे खडा आंदोलनात , रक्ताचे पाट वाहिले तरी चालेल अशी भाषा करायची आणि दुसरीकडे स्वत:च धरणाचे दरवाजे उघडायला जायचे असा दुटप्पीपणा फक्त कोल्हेंनाच जमला आहे. कार्यकर्त्यांना जनआक्रोश आंदोलनाला बोलावून रडगाणे गायचे यावरून हा आक्रोश कशासाठी होता हे सर्वसामान्य जनतेने ओळखले आहे.

जनआक्रोश आंदोलनात पाट पाण्याच्या प्रश्नावर दिशाभूल करणाऱ्या कोल्हेंनी मागील पाच वर्ष कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रातून मुंबईला घेतली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडीच किलोमीटर पर्यंतच तर कुठे त्याच्या आतच पाणी देवून शेतकऱ्यांची बोळवण केली त्यामुळे कोल्हेंना आवर्तनाच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. तुम्हाला जनतेने का नाकारले व तुमच्याकडे सत्ता का नाही याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असे त्यांनी म्हटले आहे

आजही भर उन्हाळ्यात कालव्यांना आवर्तन सूरु आहे हे जनआक्रोश आंदोलनात माजी आमदारांनी कबूल केले आहे. तरीदेखील आवर्तनाचे प्रश्नावर तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल करतात हे जनता जाणून आहे. जनआक्रोश आंदोलन करण्याची आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती का? याचा जरा खाजगीत कानोसा घ्या. असा सल्ला त्यांनी शेवटी दिला.

चौकट

तुम्हाला खरोखर जनतेची एवढीच काळजी असेल तर महागाईच्या प्रश्नावर आक्रोश करा मात्र बालहट्टापायी बालीशपणा करू नका – कारभारी आगवन .

Leave a Reply

You cannot copy content of this page