संजीवनी अकॅडमी चमूला ॲथलेटिक्स आणि स्केटींग स्पर्धेत १५ पदकं -डाॅ. मनाली कोल्हे
15 medals in Sanjeevani Academy Chamula Athletics and Skating Competition – Dr. Manali Kohle
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on:Mon 2 May 2022, 18.20
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव: संजीवनी अकॅडमी च्या चमूने संगमनेर येथील सहोदया संगम संचलित आंतरशालेय जिल्हा स्तरीय ॲथलेटिक्स आणि स्केटींग स्पर्धेत पंधरा पदक पटकविली असल्याची माहिती, संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांनी दिली आहे.
डाॅ.मनाली कोल्हे पुढे म्हणाल्या, या स्पर्धेत जिल्ह्यातील १२ सीबीएसई स्कूल्स मधिल सुमारे ५०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. संजीवनी अकॅडमी मध्ये राष्ट्रीय निपुणता धारक प्रशिक्षक व सर्व पायाभुत सुविधामुळे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात आघाडीवर असतात.
या स्पर्धांमध्ये इनलाईन रिंगरेस या क्रीडा प्रकारात अथर्व बाविसकर व सुयश शेजवळ यांनी सुवर्ण पदक मिळविले तर सुयश शेजवळने कास्य पदक मिळविले. रोडरेस स्केटींगमध्येही अथर्व व स्वरीतने कास्य पदक मिळविले. १०० मीटर व ८०० मी धावण्याच्या स्पर्धेत वेदांत आढावने अनुक्रमे सुवर्ण व कास्य पदके मिळविले. २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत हर्षवर्धन नेमाणे याने कास्य पदक मिळविले. गोळाफेक स्पर्धेत निर्भय पारख ने रौप्य पदक जिंकले. हर्डल रेसमध्ये मिताली गवळीने सुवर्ण , सोहम वाघ यांनी रौप्य व रेयांश कारवाने कास्य पदकांची कमाई केली. ४ x १०० रिले रेस मध्ये रेयांश कारवा, देवेंद्र जांगडा, सोहम वाघ व यथार्थ चिने यांच्या टीमने कास्य पदक मिळविले. मुलींच्या ४ x १०० रिले रेस मध्ये मिताली गवळी, सारा शेख , किरण कोकाटे व स्वरा कोकाटे यांच्या टीमने रौप्य पदक मिळविले. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षिका यामिनी मिश्रा यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे तर डाॅ. मनाली कोल्हे यांनी सर्व खेळाडूंचे छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी संचालिका प्राचार्या सुधा सुब्रमण्यम, प्राचार्या शैला झुंजारराव उपस्थित होत्या.