अहमदनगर जिल्ह्यात १६ साखर कारखान्यांनी केले उच्चांकी दिड कोटी  मेट्रिक टन उसाचे गाळप,

अहमदनगर जिल्ह्यात १६ साखर कारखान्यांनी केले उच्चांकी दिड कोटी  मेट्रिक टन उसाचे गाळप,

In Ahmednagar district, 16 sugar mills crushed 1.5 crore metric tons of sugarcane.

अंबालिका खाजगी कारखाना गाळपात सर्वात पुढेAmbalika private factory is at the forefront

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Sun 22 May 2022, 20.20
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : सहकाराची पंढरी म्हणून राज्यात अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. साखर कारखानदारी चा पाया अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे घातला गेला.

अहमदनगर जिल्हयांत १३ सहकारी व ३ खाजगी कारखान्यांनी २० मे २०२२ पर्यंत एक कोटी ५१ लाख २८ हजार ६९७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून त्यापासून एक कोटी ४८ लाख ९३ हजार ८२८ एव्हढे साखर पोते तयार केले आहे, जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा १०.७० टक्के आहे, तर नागवडे (श्रीगोंदा) तनपुरे (राहुरी), कुकडी हे तीन सहकारी तर अंबालिका (कर्जत), क्रांती शुभर (पारनेर) या दोन खाजगी कारखान्यांचे धुराडे बंद झाले आहे. साखरेचा हंगाम जिल्ह्यात पाच जून पर्यंत चालेल असा अंदाज आहे. जिल्हयात अजूनही १० लाख टन उस गाळपाअभावी तसाच शेतात उभा आहे. यंदा प्रचंड उन्हाच्या कडाक्यामुळे सर्वच कारखान्यांसमोर उसाचे गाळप कसे करायचे याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतात शेतकऱ्यांचा उस उभा असल्याने उसतोडणी मजुर, हार्वेस्टर, मुकादम, शेतकी अधिकारी, व्यवस्थापन या सर्वांची चांदी झाली असून वर्षभर घाम गाळुन शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला त्याचाच उस तोडण्यांसाठी पैशासह कारखाना व्यवस्थापनाची मिन्नतवारी करावी लागत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शेतात जाऊन पाहणी केली तर प्रादेशिक सह संचालक मिलींद भालेराव यांनी प्रत्येक कारखाना कार्यक्षेत्रात कार्यस्थळावर जात किती उस गाळपासभावी शिल्लक आहे याच्या बैठका घेतल्य पण त्यावर तोडगा काढू शकलेले नाही, अहमदनगर जिल्हयांत अल्पभुधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, स्वतःचे शेताबरोबरच ते दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करतात, उस तोडणीसाठी ते कुठून पैसे उभे करणार हा प्रश्न आहे शेवटी त्यांना पाचटासह उस पेटून देण्याची पाळी आली आहे. सहकाराचे एकेकाळचे आधारस्तंभ शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवर कसा तोडगा काढणार याची विवंचना सध्या भेडसावत आहे. जिल्ह्यात बहुसंख्य कारखान्यांनी साखरे ऐवजी इथेनॉल निर्मितीला या हंगामात प्राधान्य दिले आहे, त्यामुळे इथेनॉल मधून मधून मिळालेला पैसा ज्या शेतकऱ्यांच्या ऊस शेतात गाळप अभावी उभा आहे त्यांना जिल्ह्याच्या सरासरी ऊस उत्पादनात एवढी दुप्पट भरपाई द्यावी अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

जिल्ह्यात साखर कारखान्यांनी केले उसाचे गाळप साखर पोते तर दैनंदिन साखर उतारा टक्केवारी मध्ये पुढील प्रमाणे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी (९०७८१३), (८०७५२५) (१०.००), कर्मवीर शंकरराव काळे कोसाका कोळपेवाडी (७८२५८१), (८५७५००),(११.७५) भाऊसाहेब थोरात संगमनेर (१४७७१५०) (१५४२४९०) (११.०) वृध्देश्वर (५५५०५५) (५९६१५०) (९.११), अगस्ती (६१७७९५) (६९३४१५) (११.५०) मुळा (१४६६०३०) (१२९०३००) (९.९०) गंगामाई (१३७४२५०) (१३२०४००) (११. ००) ज्ञानेश्वर(१६१६५९०) (१६५३४००) (११.००) पद्मश्री विठ्ठलराव विखे (११,११,६६४, (७,४७,१००,) गणेश (३९१७००) (३००४२५) (१०.२५) अंबालिका (१९,४९,७६०) (२०,९५,५५०) (१०.७६) क्रांती शुगर पारनेर (१४३६१५), (१५४८७५) (१०. ८०) कुकडी (७९८००७) (८०३०९०) (१०.०७) नागवडे (८९४६३०), (९५५२३३)(१०.६४) तनपुरे (४८५६७७) (५४९९२५), (११.२०) केदारेश्वर (५५३२८०) (५२६४५०) (११.००)

Leave a Reply

You cannot copy content of this page