दोन दुचाकी चोरांना पकडले; २० दुचाकी जप्त; कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई
Caught two bike thieves; 20 two-wheelers seized; Kopargaon city police action
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Sun 22 May 2022, 20.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहर पोलिस स्टेशनतंर्गत शहर पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी करीत बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून सुमारे ८ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या विविध कंपनीच्या २० दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी या गुन्ह्यात गोविंद संजय शिंदे (२१) (रा. बेट ता. कोपरगाव) व आशिष राममिलन कोहरी(रा. पुणतांबा चौफुली, कोपरगाव मूळ राहणार मंगोली जिल्हा अमेठी उत्तर प्रदेश ) या दोघांना अटक केली. त्यांनी आपण नाना पानसरे कोपरगाव पुर्ण नाव माहीत नाही याच्या साथीने विविध ठिकाणाहून दुचाकी, ॲक्टिवा, स्कुटी अशी एकूण २० वाहने चोरी केली आहेत असे सांगितले. त्यांच्याकडून माहिती घेऊन चोरीची २० वाहने जप्त करण्यात आली आहेत. या दोन्ही आरोपींना अटक केली आहे तर तिसरा आरोपीचा नाना पानसरे यांचा शोध सुरू आहे.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील व परिसरातील चोरीला गेलेल्या दुचाकीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याचे माहिती शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली दरम्यान दुचाकी चोरीला गेलेल्या मालकांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पुंड करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पुंड, पोलीस कॉन्स्टेबल, जे.पी. तमनर, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राम खारतोडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे या शहर पोलीस पथकाने यांनी केली आहे.