संजीवनी पाॅलीटेक्निक कॅम्पस प्लेसमेंट; ४७ विद्यार्थ्यांची बजाज ऑटोत  निवड – अमित कोल्हे

संजीवनी पाॅलीटेक्निक कॅम्पस प्लेसमेंट; ४७ विद्यार्थ्यांची बजाज ऑटोत  निवड – अमित कोल्हे

Sanjeevani Polytechnic Campus Placement; Selection of 47 students in Bajaj Auto – Amit Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Mon 23 May 2022, 16.20

By

राजेंद्र सालकर

कोपरगांवः संजीवनी के.बी. पी. पाॅलीटेक्निकच्या इलेक्ट्रिकल , मेकॅनिकल व मेकॅट्राॅनिक्स विभागातील ४७ विदयार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत वाहन क्षेत्रातील आघाडीच्या बजाज  ऑटो लिमिटेड कंपनीत  ट्रेनी  इंजिनिअर्स या पदावर मुलाखतीनंतर निवड झाल्याची माहिती संजीवनी ग्रुप  इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली. ही संजीवनी  पॉलिटेक्निकच्या  यशाची पावती असल्याचेही ते म्हणाले

 अमित कोल्हे पुढे म्हणाले की, ऊद्योग जगताची गरज ओळखुन संजीवनीमध्ये विद्यार्थ्यांना  पहिल्या वर्षापासून न मुलाखती कशा  द्याव्यात, आपापल्या क्षेत्रात कोणते अद्ययावत ज्ञान घ्यावे, संभाषण कौशल्य, देहबोली, इत्यादी बाबींचे प्रशिक्षण  देण्यात येते. त्यामुळेच संजीवनीचे   मोठ्या संख्येने नामांकित कंपन्यांच्या कसोटीत उतरत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना  पुढे उच्च शिक्षणासाठी जायचे नाही अशा  सर्व विध्यार्थ्यांना  कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन देण्यासाठी प्रयत्न असतो.
                संजीवनी  ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, विश्वस्त  सुमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला व  पालकांचे अभिनंदन केले, . यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर  प्रा. आय. के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. साहेबराव दवंगे, प्रा. जी.एन. वट्टमवार, प्रा. गणेश  जोर्वेकर, प्रा. प्रविण खटकाळे व प्रा. योगेश  जगताप उपस्थित होते.
बजाज ऑटो निवड झालेले विद्यार्थी समृध्दी गोर्डे, जयेश गंगाधर डांगे, प्रसाद चव्हाण, गार्विता मोरे, अवांतिका भोसले, श्रृतिका गोरे, कल्याणी भोरकडे, अजय मोरे, सारीका गुंजाळ, प्रज्वल दवंगे, वेदांत पाटील, शीतल शेलार , देवेंद्र साळवे, वैष्णव भाकरे, विवेक जपे, प्रसाद टुपके, साई होन, समाधान त्रिभुवन, केतन आढाव, शिवानी गायकवाड, शिवम वाघ, हर्ष जाधव, स्नेहल वहाडणे, अनिकेत जऱ्हाड , निखिल सांगळे, अल्लाबक्क्ष पठाण, प्रतिक साळवे, विक्रम जगताप, सुयश कर्जुले, सुधांशू पाचोरे, प्रेरणा सांगळे, अक्षय मोकळ, अजय सुराळकर, शिवराम जगताप, तेजस विकास चव्हाण, सद्गुरू चिंचपुरे, सागर सोनवणे, संध्या म्हैस, विशाल शिंदे, ऋतिक जगताप, मुजम्मिल सय्यद, रोहित जाधव, ऋशिकेश मोरे, हरीओम देशमुख, मयुरी कोते, साजिद पिंजारी व सुजित डुकरे यांचा समावेश आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page