रांगोळी कला व संस्कार पुढच्या पिढीकडे नेण्याचे काम माता भगिनींनी करावे- न्या. सयाजीराव को॒-हाळे

रांगोळी कला व संस्कार पुढच्या पिढीकडे नेण्याचे काम माता भगिनींनी करावे- न्या. सयाजीराव को॒-हाळे

Mothers and sisters should take Rangoli art and culture to the next generation.Justice Sayajirao Kotra-hale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on :Sun 5 June, 18.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव: टिव्ही मालिका,मोबाईल आणि सोशल मीडियामुळे भावी पिढीवर अनिष्ट परिणाम होत आहेत. अशा काळात रांगोळी काढण्याची परंपरा व संस्कार कलेचे संक्रमण पुढील पिढीकडे नेण्याचे काम माता-भगिनींनी करुन या कलेचे महत्व टिकवावे.असे आवाहन जिल्हा न्या. सयाजीराव को-हाळे यांनी केले आहे.

कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत सूर्य तेज संस्था आयोजित सामूहिक सहकार्यातून दीपावली-पाडवा ‘घर तेथे रांगोळी स्पर्धा – २०२१’ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी , राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डाॅ.रामदास आव्हाड, नारायण अग्रवाल, सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके, प्रा.लता भामरे,ॲड.स्मिता जोशी, डॉ.निलिमा आव्हाड, उपप्राचार्या मंगला राजेभोसले, प्रा. मसुदा दारुवाला आदि मान्यवर उपस्थित होते. न्या. को॒-हाळे पुढे म्हणाले,आपण रांगोळी कलेचा रामायण, महाभारत या ग्रंथात या उल्लेख आढळतो.रांगोळी स्वागताचे प्रतिक आहे.ग्रामीण भागात रांगोळीचे दगड आणून ते खलबत्त्यात कुटून रांगोळी केले जात हे संस्काराचे संक्रमण कुठेतरी थांबल्या असल्याची खंत त्यांनी शेवटी व्यक्त केली व उपक्रमाच्या आयोजनाबद्दल सूर्यतेजच्या सदस्यांचे आणि सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन केले.

डॉ.रामदास आव्हाड म्हणाले, सूर्यतेजचे माध्यमातून २१ वर्षांपासून निरंतर सुरू असलेले सामाजिक, सार्वजनिक उपक्रम हे सेवाभावी कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

रांगोळी स्पर्धेतील पारंपरिक, निसर्गचित्र,व्यक्ती चित्र, सामाजिक विषय, व्यंगचित्र या पाच प्रकारातील प्रथम विजेत्यांना पैठणी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तर गुणवत्ता यादीतील स्पर्धकांना सन्मानचिन्ह, भेटवस्तू, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा.अनिल अमृतकर, प्रा.प्राजक्ता राजेभोसले,सौ.वासंती गोंजारे, महेश थोरात,अनंत गोडसे,प्रा.अतुल कोताडे, प्रा.मतीन दारुवाला,रश्मी जोशी, गौरी दिवटे, पत्रकार वनीता भसाळे, रुतुजा कोळपकर, सुशील टोरपे,दर्शना हलवाई, वंदना अलई यांनी परिश्रम घेतले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page