संजीवनी पाॅलीटेक्निकच्या २४ विद्यार्थ्यांची एल अँड टी डीफेन्स मध्ये निवड- अमित कोल्हे
Selection of 24 students of Sanjeevani Polytechnic in L&T Defense – Amit Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on :Sun 5 June, 18.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव: संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत देशाच्या संरक्षण विभागासाठी जमीन आधारीत शस्त्र प्रणाली, हवाई व तोफखाना प्रणाली, अग्निनियंत्रण प्रणानीसह नौदल शस्त्र प्रक्षेपण प्रणाली, लढाऊ अभियांत्रिकी प्रणाली, दळणवळण, इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या एल अँड टी डीफेन्स या नामांकित कंपनीने संजीवनी पाॅलीटेक्निकच्या अंतिम वर्षातील एकुण २४ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी म्हटले आहे की प्रत्येक पालक आपल्या पाल्याला चांगली नोकरी मिळाली पाहीजे, हे स्वप्न डोळ्यात साठवुन काही पालकांच्या बाबतीत आपली आर्थिक हतबलता पाल्यांच्या शैक्षणिक प्रवाहात आडवी येणार नाही याची काळजी घेत, किंबहुना वेळ प्रसंगी कोणतीही तडजोड करीत आपल्या पाल्यांच्या पंखांना बळ देतात. यासाठी आपल्या पाल्यांना संजीवनी मधुन नोकरी मिळणारच या विश्वासाने पालक जाणिव पुर्वक त्यांच्या पाल्यांना संजीवनीमध्ये दाखल करतात. अगदी पहील्या वर्षापासून विभाग निहाय विध्यार्थ्यांना उद्योग जगताला अभिप्रेत असलेले ज्ञान दिल्यामुळे आज सर्व गरजु विद्यार्थ्यांना संजीवनी मार्फत नोकऱ्या मिळत आहे.
अलिकडेच एल अँड टी डीफेन्स या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रज्वल जयंत दुरगुडे, दिपक उत्तमराव कोहकडे, अमित धनंजय बोरसे, साईराज बाबासाहेब खोंड, धैर्यशिल विजय ढोकणे, रोहीत गणेश जाधव, तेजस विकास चव्हाण, आकाश नामदेव घोलप, प्रतिक संजय साळवे, अनिकेत बाळासाहेब शिंदे , शिवराम संजय जगताप, अलबक्ष अब्दुल पठाण, प्रेरणा विलास सांगळे, संध्या नानासाहेब म्हैस, आदित्य बाळासाहेब हाडोळे, वैभव दिलीप औताडे, विक्रम जालींदर जगताप, रोहीत गणेश जाधव, आकाश कुमार, अंकिता किरण सोनवणे, चैतन्य महेंद्र चौधरी , पवन चंद्रकांत वाटेकर, आकाश शेषराव आल्हाट व महेश लक्ष्मण गुंजाळ यांचा समावेश आहे.
हे सर्व विद्यार्थी त्यांच्या अंतिम वर्षाच्या निकालानंतर सेवेत रूजु होणार आहेत. विध्यार्थ्यांच्या निवडीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी त्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच श्री अमित कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. साहेबराव दवंगे, प्रा. गिरीश वट्टमवार, प्रा. गणेश जोर्वेकर, प्रा. प्रविण खटकाळे व प्रा. योगेश जगताप उपस्थित होते.