कोण होणार करोडपती” कार्यक्रमाचे  थेट प्रेक्षक म्हणून कोपरगावातून १० जणांना संधी

कोण होणार करोडपती” कार्यक्रमाचे  थेट प्रेक्षक म्हणून कोपरगावातून १० जणांना संधी

Opportunity for 10 people from Kopargaon to be a live spectator of ‘Who will become a millionaire’

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on :Fir 3 June, 19.00
By
राजेंद्र सालकर

 कोपरगाव : सोनी मराठी वाहिनीवरील “कोण होणार करोडपती” हा बहुचर्चित कार्यक्रम  ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमासाठी कोपरगावातून १० जणांना थेट प्रेक्षक म्हणून संधी मिळाली आहे.

या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळणार आहे. सोनी मराठी चॅनलच्या टीमने एस.जी. विद्यालय येथे “कोण होणार करोडपती” या कार्यक्रमाचे गुरूवारी (२जुन) रोजी कोपरगाव येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला एस. जी. विद्यालय व संत ज्ञानेश्वर स्कूल च्या विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

कैलासचंद ठोळे,सपना जाधव, चंदुलाल बजाज, डॉ.सोनिया रणदिवे, कला शिक्षक अतुल कोताडे, राजेंद्र कोयटे, प्रियंका सोनवणे,दिलीप तुपसैंदर,नितीन जाधव, विजय कासलीवाल या दहा जणांची अभिनेता सचिन खेडेकर यांच्या “कोण होणार करोडपती” या कार्यक्रमासाठी थेट प्रेक्षक म्हणून गोल्डन पास देऊन निवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन कोपरगावात प्रथमच केल्याबद्दल सोनी मराठीच्या टीमने सुशांत घोडके, श्रीकांत बागुल तसेच विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनी मराठीचे आर.जे. श्रीकांत यांनी केले.

 स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले.

यावेळी कैलास ठोळे, चंद्रकांत ठोळे, दिलीप अजमेरे, सचिन अजमेरे, संदीप अजमेरे, विशाल झावरे, विवेक सोनवणे, आर.बी. गायकवाड रायते यु.एस,सौ. मोनाली निंबाळकर,सौ. पल्लवी तुपसौंदर, उमा रायते, सचिन मोरे, वसुधा झावरे,प्रियांका शेलार, सोनाली हुळेकर, स्वाती गहिरे, अनुप गिरमे यांचे सह श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय आणि संत ज्ञानेश्वर स्कूलचे शिक्षक, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page