कै. शंकरराव  कोल्हे यांचा सेवा व्रताचा वसा पुढे अधिक नेटाने-श्री सुमित कोल्हे                                  

 कै. शंकरराव  कोल्हे यांचा सेवा व्रताचा वसा पुढे अधिक नेटाने-श्री सुमित कोल्हे

Shankarrao Kolhe’s Seva Vrata’s fat further netane-Shri Sumit Kolhe

संजीवनी आयुर्वेदा हाॅस्पिटल मार्फत मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर संपन्नFree Diagnosis and Treatment Camp through Sanjeevani Ayurveda Hospital

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 20 June, 18.40
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव -माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर  समाजातील सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या  माध्यमातुन योगदान दिले. सध्याच्या परिस्थितीमध्ये, विविध व्याधी व दैनंदिन जीवनातील ताणतनाव यांमधुन समाज उत्तम आरोग्याकडून नवनवीन समस्यांच्या गर्तेत खेचला जात आहे. समाजातील सर्वच घटकातील व्यक्तींना उत्तम आरोग्य सेवा मिळाली पाहीजे, या हेतुने कै. शंकरराव  कोल्हे यांच्या विचारधारेतुन उभे राहीलेले खिर्डी-गणेश  परीसरात संजीवनी आयुर्वेदा हाॅस्पिटल ही त्यांच्या जीवनातील शेवटची संस्था ठरली. याच हाॅस्पिटल मार्फत मागील तीन-चार महिन्यांपासुन नाममात्र शुल्कामध्ये आरोग्य सुविधा देण्याचे काम सुरू आहे. खेडोपाडी जावुन लोकांना आरोग्य सुविधा द्या, असे साहेबांचे सांगणे असायचे, त्यानुसार पहिले मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीर  खिर्डी गणेश  गावात घेण्यात आले. कै. कोल्हे साहेबांच्या सेवा व्रताचा वसा यापुढे अधिक नेटाने पुढे नेवु, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त  सुमित  कोल्हे यांनी . शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी

खिर्डी  सोसायटीचे चेअरमन  चंद्रभान रोहम  होते.

यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष मारूती चांदर, सरपंच सौ. सरला चांदर, उपसरपंच चंद्रकांत चांदर, संजीवनी पतसंस्थेचे चेअरमन  प्रदिप नवले, अनेक नवेजुने कार्यकर्ते , ग्रामस्थ,  आयुर्वेदा हाॅस्पिटलचे अधिक्षक डाॅ. राम पवार उपस्थित होते.
या शिबिरात  १००  पेक्षा अधिक रूग्नांची विनामुल्य तपासणी करण्यात आली व उपचारही करण्यात आले. ज्यांना पुढील उपचाराची अथवा शस्त्रक्रियेची गरज होती, त्यांना हाॅस्पिटल मध्ये बोलविण्यात आले.  
सुमित  कोल्हे पुढे म्हणाले की कै. कोल्हे साहेबांनी घालुन दिलेल्या मार्गदर्शक  तत्वांनुसार, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री बिपीनदादा कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  कार्याध्यक्ष  नितीन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांचे प्रेरणेतुन शैक्षणिक  क्षेत्रात संजीवनीने देश  पातळीवर नावलौकिक प्राप्त केला, तसाच नावलौकिक आरोग्य क्षेत्रातही होईल. सुखी, निरोगी, स्वावलंबी व सुसंस्कारीत परिवार डोळ्यासमोर  ठेवुन स्थापन करण्यात आलेल्या संजीवनी आयुर्वेदा हाॅस्पिटल मार्फत असहाय आणि पीडित समाजाला ओंजळीत घेऊन आधार देण्याबरोबरच त्यांच्या जीवनात फुलासारखा आंनद भरण्यासठी कटीबध्द राहु, असे सांगीतले.
डाॅ. पवार यांनी सांगीतले की आयुर्वेद ही प्राचीन उपचार पध्दती असुन या उपचारामुळे कोणतेही साईड इफेक्टस् होत नाही. सध्या संजीवनी आयुर्वेदा हाॅस्पिटल मध्ये सर्व प्रकारच्या शस़्त्रक्रिया, स्त्रियांचे विविध आजार व उपचार, अत्यल्प दरात प्रसुती, अत्यल्प दरात रक्त, लघवी तपासणी,  अॅडमीट रूग्नांना मोफत जेवण, हाडांचे विविध आजार, पंचकर्म चिकित्सा, फिजिओथेरपी, मधुमेह व स्वासांचे विकार, संधीवात, आमवात, थायराॅईड, पोटाचे विकार, अशा  विविध सुविधा असल्याचे सांगीतले.
या  शिबिरात  डाॅ. पवार यांचे सह डाॅ. भरत कुलथे व डाॅ. शीतल  अष्टेकर  यांनी रूग्नांची तपासणी करून उपचार केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page