श्री चक्रधरस्वामी अवतरण अष्टशताब्दी वर्षानिमित्त राज्यपाल कोश्यारींनी श्रीक्षेत्र डोमेग्राम येथे भेट द्यावी

श्री चक्रधरस्वामी अवतरण अष्टशताब्दी वर्षानिमित्त राज्यपाल कोश्यारींनी श्रीक्षेत्र डोमेग्राम येथे भेट द्यावी

Governor Koshyari should pay a visit to Shrikshetra Domegram on the occasion of Shri Chakradharaswamy incarnation

महानुभावांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेटA delegation of dignitaries met the Governor

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 20 June, 18.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधरस्वामी यांच्या अवतरण अष्टशताब्दी वर्षानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्रीक्षेत्र डोमेग्राम (जि. अहमदनगर) येथे भेट द्यावी, असे निवेदन महानुभावांच्या शिष्टमंडळाने दिले. या संदर्भात अखिल भारतीय महानुभाव परिषद, अखिल भारतीय महानुभाव महामंडळ यांच्यासह इतरही संघटनांच्या प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. शिष्टमंडळाने राज्यपालांना श्री चक्रधर स्वामींच्या कार्याची माहिती दिली.

श्रीक्षेत्र डोमग्राम

या शिष्टमंडळात हरिहर पांडे, महंत विध्वांसबाबा, ॲड तृप्ती बोरकुटे, महंत हंसराजबाबा खामणीकर, महात्मा चेतन नागराज, बन्सीधर राजूरकर, महात्मा सागरदादा तळेगावकर, देवेंद्र भुजबळ, साजन शेंडे, संदीप भारंबे आदी उपस्थित होते. मराठीला देववाणीचा दर्जा मिळवून देणारे ‘भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे अवतरण अष्टशताब्दी वर्ष’ यंदा सर्वत्र साजरे होत आहे. स्वामींनी कर्मभूमी म्हणून महाराष्ट्राची निवड केली. आपले तत्त्वज्ञान मराठीत निरूपण केले. सत्य, अहिंसा, मानवता, समानता ही मूल्ये समाजाला दिली.

आजही संपूर्ण भारतात १.५ कोटी तर महाराष्ट्रात ३ टक्के मंडळी महानुभाव पंथीय आहेत. ही बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली. शासनाने पुढाकार घेऊन ‘सर्वज्ञ अष्टशताब्दी वर्ष’ साजरे करावे. श्री चक्रधर स्वामींच्या, आणि पंचवतारांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या महाराष्ट्रातील २४५ गावांमध्ये १६५० स्थाने आहे, तिथे लाखो भाविक दरर्षी जातात. या तीर्थस्थानांवर सोयी सुविधा व्हाव्यात. नोंदी नसलेल्या स्थानांची नोंद शासकीय दस्तावेजात करावी. सुमारे ७०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन स्थानांचे जतन व्हावे, यासंदर्भात शासनाने दिशानिर्देश जारी करावेत. स्थानांपर्यंत जाणारे मार्ग प्रशस्त करावे, वीज, पाणी, स्वच्छतागृहे या मूलभूत सुविधा असाव्यात.

अहिंसा मार्गाने चालणारा भक्ती संप्रदाय असल्याने तीर्थस्थानांच्या ठिकाणी मद्य, मांस या दुकानांसाठी बंदी असावी. औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील २०० तीर्थस्थानांना जोडणारा ‘सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग’ तयार करण्यात यावा. या विषयांवर महामहीम राज्यपाल यांचेसोबत शिष्टमंडळाने चर्चा केली. महानुभावांच्या श्रद्धास्थानांचे संवर्धन व्हायला हवे, यावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला योग्य निर्देश देण्यात येतील असे सांगितले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page