कोणतीही सकारात्मक कृती घडण्यासाठी विचारांचा रिमोट कंट्रोल हातात असायला हवा – डॉ. कोहिनकर

कोणतीही सकारात्मक कृती घडण्यासाठी विचारांचा रिमोट कंट्रोल हातात असायला हवा – डॉ. कोहिनकर

For any positive action to take place, the remote control of thoughts must be in hand – Dr. Kohinkar

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 20 June, 19.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव :माणसे ज्याप्रमाणे विचार करीत असतात त्याप्रमाणेच कृती घडत जाते. विचार सकारात्मक असतील तर कृती चांगली घडते आणि तेच विचार नकारात्मक असतील तर कृतीही वाईट घडत जाते, यासाठी आपल्या विचारांचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असायला हवा असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध लेखक व माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी संवत्सर येथील कार्यक्रमातून केले.

स्व. परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  राजेश परजणे, अनिल गुंजाळ,. प. पूज्य रमेशगिरी महाराज, मेजर सूर्यवंशी महाराज, प. पूज्य रामशास्त्री महाराज, ह. भ. प. भालुरकर महाराज, सौ. शालिनीताई विखे पाटील, शिवशाहीर विजय महाराज तनपुरे, कृष्णराव परजणे, राजेंद्रबापू जाधव, अजय फटांगरे, सचिन सूर्यवंशी, समर्थ शेवाळे, पंडितराव वाघिरे, सौ. सुलोचना ढेपले यांची प्रमुख उपस्थिती होती.

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या अठराव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित कार्यक्रमात ‘ मनाची अमर्याद शक्ती व तनावमुक्ती ‘ या विषयावर ते बोलत होते. पुणे येथील शिक्षणतज्ज्ञ अनिल गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी संत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख प. पूज्य रमेशगिरीजी महाराज, जंगली महाराज आश्रमाचे मेजर सूर्यवंशी महाराज, पुणे येथील प. पूज्य रामशास्त्री महाराज, ह. भ. प. भालुरकर महाराज, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, शिवशाहीर विजय महाराज तनपुरे, पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे, गोदावरी दूध संघाचे संचालक राजेंद्रबापू जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, राहात्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे, सरपंच सौ. सुलोचनाताई ढेपले यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी स्व. परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

ताणतणाव ही संपूर्ण भारत देशाची गंभिर समस्या झालेली आहे. मधुमेह व उच्च रक्तदाब यामध्ये भारताचा क्रमांक सर्वांत वरचा आहे. ताणतणाव हा प्रत्येकालाच असतो परंतु तो सार्वजनिक करु नये. कोणतीही समस्या सार्वजनिक झाली तर त्यातून मार्ग निघण्याऐवजी ती अधिक वाढत जाते. यासाठी सकारात्मकतेने विचार करणे हाच खरा उपाय आहे असे सांगून डॉ. कोहिनकर पुढे म्हणाले, आपले मन हे निसर्गाने आपल्याला बहाल केलेले सर्वात मौल्यवान धन आहे. जे कुणी आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. मनाचे बाह्यस्तर आणि आंतरस्तर ही दोन स्तर आहेत. बाह्यस्तर म्हणजे चेतन मन आणि आंतरस्तर म्हणजे अचेतन मन. अचेतन मन हे सुपीक जमिनीसारखे आहे. चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या बीजांचा ते स्वीकार करते. नकारात्मक व विध्वंसकारी विचार आपल्या अचेतन मनात नकारात्मक रूपाने कार्य करीत असतात. ‘ मला हे जमणार नाही, मी हे करूच शकणार नाही ‘ ही नकारात्मकता अचेतन मनातून येते. यासाठी चेतन मनाकडून काही प्रेरक संदेश घेऊन स्वतःला नियंत्रित करता आले पाहिजे. ‘ मला हे नक्की जमेल, आणि मी हे करणारच ‘ ही सकारात्मक उर्जा चेतन मनाकडून आपल्याला मिळते.

माणसाच्या जीवनात इच्छाशक्तीला खूप महत्व आहे. मनाच्या सामर्थ्याचा तो एक भाग असून एक अमूर्त शक्ती आहे. जी अविरत परिश्रमाने प्रत्यक्षात आणता येते. त्याची प्रचिती माणसाच्या कृतीमधून येते. आपल्या मनातील विचार किंवा कल्पना प्रत्यक्ष रुपात आणण्यासाठी आपला मेंदू हा शरीराला नेहमी सूचना देत असतो. ही मानवी जीवनात घडणारी संपूर्ण प्रक्रिया मनावर अवलंबून असते. यासाठी आपल्या मनावर आपले पूर्णपणे नियंत्रण असणे गरजेचे आहे. मनाची एकाग्रता आणि इच्छाशक्ती या दोन्हींचा खूप जवळचा संबंध आहे. जी गोष्ट तुम्ही करायवाची ठरवली आहे त्याच्यावर तुमचे मन केंद्रीत करा. एकाग्रतेमुळे मनाची शक्ती वाढते असे मार्गदर्शनही डॉ. कोहिनकर यांनी केले.

शिक्षणतज्ज्ञ अनिल गुंजाळ यांचेही यावेळी अध्यक्षीय भाषण झाले. आपल्या भाषणात त्यांनी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या कार्याला उजाळा दिला. महिला महाविद्यालयातील २० विद्यार्थीनींना सुमारे ९३ हजार रकमेची शिष्यवृत्ती पाहुण्यांच्या हस्ते बहाल करण्यात आली. संवत्सर येथील श्री सहाणे टेलर यांच्यातर्फे जनता हायस्कूलमधील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलेत. तर कु. स्नेहल देवराम खेमनर या विद्यार्थीनीने तयार केलेले स्व. परजणे आण्णा यांचे स्केच शाळेला भेट देण्यात आले.

कार्यक्रमास प्राचार्य सांगळे, प्राचार्य सूर्यवंशी, जयराम पाचोरे, महेंद्रशेठ काले, रोहिदास होन, मधुकर टेके, बाबासाहेब फटांगरे, आंबादास देवकर, भागवतराव देवकर, अनिल सोनवणे, संजय भनसाळी, राजेंद्र शिरोडे, विजयराव जाधव, भास्करराव तिरसे, उत्तमराव माने, गोपीनाथ केदार, ॲड. गंगाधर कोताडे, भागवतराव धनवटे, सुभाषराव लुंपाटकी, शरदराव थोरात, योगेश जोबनपुत्रा, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, भरत घोगरे यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक उपस्थित होते. गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page