समताचे पालकत्व स्वीकारलेली मुलगी झाली इंजिनियर; आठ लाखाचे वार्षिक पॅकेज 

समताचे पालकत्व स्वीकारलेली मुलगी झाली इंजिनियर; आठ लाखाचे वार्षिक पॅकेज

The daughter who accepted the guardianship of Samata  became an engineer; Annual package of eight lakhs

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 7July, 18.40
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : समता परिवाराने पालकत्व स्वीकारलेल्या कु.पायल पटेल या मुलीने संजीवनी अभियांत्रिकीत आय. टी.क्षेत्रातील बी.ई.पदवीचे शिक्षण घेत बंगळूर येथील क्रिप्ट इंडिया प्रा.ली. या आंतरराष्ट्रीय कंपनीत ८ लाख रुपये वार्षिक पॅकेज देत निवड करण्यात आली आहे. तिच्या परिवारासोबतच समता परिवारासाठी ही गौरवाची बाब असल्याचे गौरवौद्गार समता समूहाचे संस्थापक काका कोयटे यांनी कु. पायलच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.

समता परिवाराचे सर्वेसर्वा काका कोयटे हे माझे आयडॉल असून त्यांनी माझे पालकत्व स्वीकारून इ.११ वी पासून ते बी.ई.पर्यंत आर्थिक मदत केली त्यांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळेच मी माझे उज्वल भविष्य घडवू शकले. माझ्या यशाचे सर्व श्रेय समतालाच जाते, अशा भावना कु. पायल पटेल हिने सत्कार प्रसंगी व्यक्त केल्या. तालुक्यातील मुर्शतपूर येथे राहणारे गोटु सरदार पटेल यांची ती मुलगी असून तिचे वडील हे सायकलवर फिरून कपडे विकण्याचा व्यवसाय करतात.

यावर बोलताना काका कोयटे म्हणाले, ज्या मुलींमध्ये शिक्षणाची आवड, जिद्द, चिकाटी असेल तर उज्वल भविष्य घडवत आई वडिलांच्या स्वप्नांबरोबर स्वतःची ही स्वप्ने पूर्ण करत त्यांना फक्त कोणाच्या तरी सहकार्याची गरज असते. कु.पायल पटेल या मुलींमध्ये शिकण्याची जिद्द व चिकाटी पाहूनच तिचे पालकत्व स्वीकारले व तिच्या शिक्षणाची गरज समता परिवाराने पूर्ण केली. यावेळी कुमारी पायल पटेल तिच्या यशाबद्दल चॅरिटेबल ट्रस्ट,समता नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

Leave a Reply

You cannot copy content of this page