पोहेगांवत गोळीबार एक महिला ठार आरोपीला अटक
Accused arrested for killing woman in Pohegaon shooting
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 7 July, 18.20
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव: तालुक्यातील पोहेगाव येथे काल गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता शनी मंदिर राजवाडा परिसरात गोळीबार सारखी गंभीर घटना घडली या गोळीबारात महिला सुनीता संजय भालेराव (३२) यांचा मृत्यू झाला आहे. आरोपी विशाल भालेराव यांला पोलिसांनी अटक केली असून फरार झालेल्या दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.
पोहेगांव मध्ये सकाळी साडेदहा वाजता गोळीबार झालेल्या घटनेची माहिती समजताच शिर्डी पोलीस स्टेशनचे डीवाय एस पी संजय सातव, पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक संभाजी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सानप, रमेश शेख, बाळकृष्ण वर्पे ,श्री दळवी पोलीस पाटील जयंत रोहमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रत्यक्षदर्शी कुटुंबातील साहिल नितीन भालेराव ,कल्पेश सुनील, भालेराव, काजल कल्पेश भालेराव यांनी ही घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनीताला त्यांनी आधी खाजगी रुग्णालयात व नंतर शिर्डी व नंतर लोणीला हलवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आरोपी विशाल भालेराव याने बाहेरून गावठी कट्टा आणुन जखमी भावजयी सुनिता भालेराव यांना दाखवला. हा गावठी कट्टा दाखवण्याच्या नादातच घोड्याचा खटका ओढला गेला आणि आरोपींकडून सुनिता भालेराव यांच्या डोक्यात गोळी आरपार घुसली. सुरुवातीला खाजगी नंतर शिर्डी व लोणी येथे उपचारासाठी जखमी अवस्थेत सुनिता भालेराव यांना दाखल करण्यात आले. मात्र अधिक रक्तस्राव व गोळी आरपार गेल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
शिर्डी पोलीस स्टेशनचे डीवाय एस पी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक संभाजी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सानप, शेख, बाळकृष्ण वर्पे ,श्री दळवी आरोपींचा शोध घेण्यासाठी माहिती संकलित केली. अखेर गोळीबार करणारा मुख्य आरोपीला विशाल भालेराव याला पोलिसांनी बेड्या ठोकत अटक केली आहे. मात्र विशाल बरोबर असलेले दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी करत आहे.