कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला; राष्ट्रवादीकडून जल्लोष
The water problem of Kopargaon city was solved; Jallosh from NCP
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 7July, 18.50
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहराचा वर्षानुवर्षाचा पाणी प्रश्न ना. आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नामुळे मार्गी लागल्याचा जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून साजरा केला.
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्नी ना. आशुतोष काळे यांनी निवडून येताच योग्य नियोजन करून प्राथमिक स्वरूपातील खोदाई काम गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडून कंपनीकडून करून घेतली त्यानंतर महाविकास आघाडीकडे पाठपुरावा करून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या १३१.२४ कोटीच्या या कामाचा कार्यारंभ आदेश देखील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला असल्याची बातमी शहरातील नागरिकांना ना. आशुतोष काळे यांनी दिली.
पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. तर कार्यकर्त्यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.